पै.भारत लालकर(चिक्या) यांचा दुर्दैवी अपघातात अंत

 

श्रीगोंदा / लोकवेध live न्यूज 

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावचे पैलवान भारत लालकर उर्फ चिक्या या नावाने प्रसिद्ध असलेले मल्ल यांचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला. नगरच्या कुस्ती क्षेत्रात त्याच्या अनेक नामांकित मल्लशी कुस्त्या गाजल्या कुस्ती मधून अनेकाची मने जिंकली.कुस्ती क्षेत्रातला सर्वांचा आपुलकीचे प्रेमाचा आदर युक्त मनमिळाऊ पैलवान म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. एखाद्या कुस्तीमध्ये हार् झाल्यानंतर तो कधीही कोणावर न रागवता होणारी हार ही प्रेमाने जिंकत असे. नगर जिल्ह्यातल्या अनेक गावच्या फडामध्ये त्यांनी चांगल्या प्रतीच्या कुस्त्या केल्या.एक इमानदार सर्वांशी मित्री पूर्वक संबंधित असलेला पैलवान म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. चालू वर्षी त्याने चांगलीच तयारी केली होती.सदर घटनेची वार्ता कळताच त्यांच्या सर्व पैलवान मित्रांनी सदर घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. आदर युक्त व सर्व पहिलवानाशी तो प्रेमाने राहत असे. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा एक मुलगी असून अत्यंत गरीब कुटुंबातील हा पैलवान होता.त्याच्या अनेक नामांकित मल्लाशी कुस्त्या झाल्या.तो आणेक कुस्ती शोकीनाचा चाहता होता.भाजपचे महाराष्ट्राचे उत्तर विभाग प्रमुख पै.पानसरे सीबी,उपमहाराष्ट्र केसरी पै.आणिल गुजाळ,पै.अदमभाई शेक, उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार,पै.आनिल गव्हाणे.पै.आनदा खोसे.पै.राजू गव्हाणे, पै.संदीप मस्के,पै.भाजीवाले मामा,पै.शिवा आवरे,पै.भरत बोरुडे,महाराष्ट्र केसरी पै.बाला रफिक शेख,पै संदीप मस्के, पै.धनंजय राऊत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!