श्रीक्षेत्र रामेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे पिंपरणेत जोरदार स्वागत
पिंपरणे : लोकवेध live न्यूज
श्री क्षेत्र रामेश्वर धांदरफळ ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायीदिंडी सोहळ्याचे पिंपरणे गावात झाला गावात दिंडीचे आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले विठ्ठल नामाचा जयजय कार करत गावातील भाविकही मोठयाप्रमाणावर सहभागी झाले त्यामूळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.
सालाबाद प्रमाणे भास्करराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र रामेश्वर धांदरफळ येथून पायी दिंडी सोहळयाचे प्रस्थान झाले दिंडी बरोबर अरोग्य सेवेसाठी अँब्यूलंस,भोजन व्यवस्था, पाणी , ह्या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिषय शिस्तबध्द मार्गस्थ झाली
पिंपरणे येथे सायंकाळी ७वा दिंडीचे आगमन झाले दिंडीचे स्वागत गावातील श्री सतीशराव देशमुख, अविनाश देशमुख यांच्या शुभाहस्ते पुजन करण्यात आले .यावेळी संजय महाराज देशमुख,अजित देशमुख, राजेंद्र देशमुख , कैलास शेठ काळे, संतोष देशमुख, चंद्रकांत देशमुख, गंगाराम वाकचौरे, भीमा राहींज काका देशमुख आदीसह ग्रामस्थ मोठयाप्रमाणावर उपस्थित होते
दिंडीतील वारकरी व ग्रामस्थांनी गावातून प्रदक्षिणा केली यावेळी गावातील हनुमान भजनी मंडळाने दिंडीचे स्वागत केले दिंडीचा मुक्काम श्री सतीशराव देशमुख यांच्या वस्तीवर ठेवला त्या ठिकाणी सर्व वारकरी व ग्रामस्थांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यावेळी दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी गावातील उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी केली व गोळ्या औषधांचा बॉक्स वारकऱ्यांना दिला
दिंडीचा रथ अल्या नंतर पांडुरंग परमात्म्याची आरती घेण्यात आली नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन रात्री विविध धार्मिक कार्यक्रम झाले यावेळी येवले महाराज यांचे सूश्राव्य प्रवचन झाले
गेली अनेक वर्षापासून सतीशराव देशमुख, कुटूंबीय ही सेवा अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडत आहेत कुटुंबातील मुले तसेच गावातील गगनागिरी भक्त परिवार ग्रामस्थानी मदत केली
