चक्क ! एकाच शेतकरी कुटुंबातील तीन मुली पोलीसात भर्ती

 

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

बीड जिल्हयात रहाणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी मारुती जाधव यांच्या तीन मुली महाराष्ट्र पोलिसांत भतीं झाल्या आहेत. आपल्या मुलींची गरूडझेप पाहून मारुती जाधव यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या मुलींनी जिल्ह्याचे नाव रोशन केल्याचा अभिमान असून त्यांच्या या यशाचा अभिमान वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बीडमधील परळीतील सेलू तांडा गावात राहणाच्या मारुती जाधव यांनी ऊसतोड कामगार म्हणून काम सुरू केले होते. काही काळ ऊसतोड़
कामगार म्हणून काम करून त्यांनी घर चालवले. गावात त्यांच्याकडे स्वतःची जमीन किंवा कोणतीही मोठी मालमत्ता नक्हती. मात्र, तीन मुली आणि दोन मुले असा मोठा परिवार त्यांचा आहे. अशा परिस्थितीत मोठे कुटुंब चालवण्यासाठी त्यांना दिवसरात्र मेहनत करावी लागली. घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील मारुती जाथव यांनी आपल्या पाचही मुलांच्या शिक्षणात कोणताही हलगर्जीपणा केला नाही. त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार मुलींना शिक्षण दिले. खरं तर त्यांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मारुती जाधव यांची मोठी मुलगी सोनाली कोरोना काळात पोलिसात भर्ती झाली होती. तर दुसरी
मुलगी शक्ती आणि तिची लहान बहीण लक्ष्मी अलीकडेच महाराष्ट्र पोलीस झाली आहे. एकाच कुटुंबातील तीन मुली पोलिसात भर्ती होण्याचे परळीतील हे पहिलेच उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!