अभिजीत बेंद्रे यांच्या विवाहात 2500 आंबा रोपांचे वाटप

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत बेंद्रे यांनी आपल्या लग्नातील सत्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या हार, शाल, गुच्छ यांच्या ऐवजी आलेल्या  प्रत्येकाला आंब्याचे रोप देऊन वृक्ष संवर्धन संस्कृतीचे अनोखी परंपरा जपली असून या विवाहात मनोली येथील बेंद्रे परिवाराच्या वतीने 2500 आंबा रोपांचे वाटप केले आहे.

वसंत लॉन्स येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रभाकर बेंद्रे यांचे चिरंजीव अभिजीत व म्हैसगाव तालुका राहुरी येथील साकुरे परिवाराची कन्या कावेरी यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात झाला.

आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने लग्नातील हार व सत्काराचा खर्च टाळण्यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात .यामुळे बहुतांशी लग्नात हा आवश्यक खर्च टाळला जात आहे तसेच फेटे बांधले जात नाहीत.

आलेल्या पाहुण्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करताना वृक्ष देण्याची  परंपरा जोपताना मनोली येथील प्रभाकर बेंद्रे व बेंद्रे परिवाराने 2500 वृक्षांचे वाटप केले आहे.

यावेळी बोलताना महेश जोंधळे म्हणाले की, विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनात संस्मरणीय असतो. परंतु आपल्या आनंदा बरोबर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने कायम लक्षात रहावे असे आंब्याचे रोप प्रत्येक पाहुण्यांना दिले आहे .हे कोकणातून मागवलेले कलमी आंब्यांचे रोपे असून  सर्व रोपांची रोपण होणार आहे

तर अभिजीत बेंद्रे म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियान राबवले जात असून या अभियानात सहभाग नोंदवताना विवाह निमित्त 2500 आंबा रोपांचे वाटप केल्याचे समाधान आहे

विवाह समताच सर्वांनी अंबा रोपे घेण्यासाठी मोठी झुंबड केली. होती मात्र प्रत्येकाने या अनोख्या पद्धतीचे कौतुकही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!