प्रगती माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात सर्पदंश अभियाना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
आज दिनांक 7 जुलै 2023 रोजी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे प्रगती माध्यमिक व प्राथमिक विद्यालय सातपूर येथे शून्य सर्पदंश अभियाना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ गाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. संस्थेचे उपाध्यक्ष दीपक महाजन यांनी बिनविषारी सापांची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर अध्यक्ष जयेश पाटील यांनी विषारी सर्प आणि सर्पदंश झाल्यावर करायचे प्रथमोपचार तसेच सर्प विषाचे प्रकार आणि त्याच्यामुळे होणारा परिणाम या विषयावर माहिती दिली त्याचबरोबर गिधाडांचे महत्व आणि वन्यजीव संपुष्टात आल्यावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले. सापांवरील अंधश्रद्धा आणि इतर माहिती ही आदित्य केदारे आणि हेमंत कोलते यांनी दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील सापांविषयी असलेले गैरसमज हे प्रश्न उत्तरं द्वारे दूर करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल चव्हाण, श्री सचिन देसले, वनविभागाच्या सातपूर विभागाचे श्री झुटे सर तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्या परिसरात सापांचा वापर हा वाढलेला दिसतो अशा वेळेस घाबरून न जाता सापावर सुरक्षित अंतरावर राहून लक्ष ठेवून सर्पमित्रांना किंवा वनविभागाला संपर्क करावा. तसेच नाशिक मधील कुठल्याही सोसायटीमध्ये शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रम घ्यायचा असल्यास संस्थेच्या 8149330873 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा.
– जयेश पाटील (अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था नाशिक)
