आज नाशिक मध्ये मोठ्या दिमाखात सह्याद्री मित्र संमेलन पार पडले
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
जसे पांडुरंगाच्या भेटीला ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आळंदि येथुन निघते. तेव्हा कोणत्याही वारकऱ्याला निमंत्रण द्यायची गरज लागत नाहि लाखोंच्या संख्येने ते गोळा होतात. त्याचप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रातून आज सह्याद्रितील भटके मंडळी आपोआप जमा झाले होते. नाशिकचे प्रसिद्ध ट्रेकर स्व जोशी काकांच्या स्मृती जागवण्याकरता आजचे हे संमेलन महाकवीने कालीदास नाट्यगृहात साजरे झाले. जणु काहि ट्रेकरांचा कुंभ मेळाच भरला गेला कि काय असा भास होत होता. नेहमी ज्यांचा भेट हि सोशल मिडिया मधुन होत असते ते आज प्रत्यक्ष भेटत होती. विचारांची अदान प्रदान उत्साहात सुरु होती.
संमेलनाकरता हरीष कपाडिया व आनंद पाळंदे ह्यांच्या सारखे इतर दिग्गज उपस्थित होते. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन समस्त भटक्यांना लाभले. पाहुण्यांच्या हस्ते ह्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी ज्यांचा झाली त्यांना भरघोस रक्कम देऊन गौरवण्यात आले.
संमेलनाच्या यशस्वी होण्याकरता नाशिक मधील सर्व ट्रेकर मंडळींनी आपला खारीचा वाटा उचलला. आजचे हे पहिले सह्याद्रीचा मित्र संमेलन खासच ठरले.
श्रीराम त्रंबकराव गायकवाड.
