महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकार शेतकऱ्यांचे पिक विमा व अतिवृष्टीचे पैसे कधी देणार ? वसंत मुंडे
मुंबई / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अति वेगाने चालू असून त्रिमूर्ती सरकार स्थापन झाले पण शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे नैसर्गिक संकट आलेले आहे त्यात अतिवृष्टी व पिक विम्याचे पैसे शेतकऱ्याचे हक्काचे असतानाही वाटपास विलंब का? असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. मराठवाडा खानदेश विदर्भ या भागात कमी पाऊस झाल्यामुळे पेरणीला विलंब लागत पासून कृषी खात्याला शासनाचे आदेश असूनही कृषी खात्याचे अधिकारी बोगस खत बी बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्यावर व विक्रेत्यावर कारवाई केली जात नाही . कृषी मंत्र्याचे अभय आहे काय असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . खरीप २०२० पासून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे खूप नुकसान झाले कोरोना व टाळे बंदीमुळे पिक विमा कंपन्यांनी ७२ तासाच्या अट टाकल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची माहिती देणे शक्य झाले नव्हते, . राज्य व केंद्र सरकारच्या एस डी आर एफ अथवा एनडीआरएफच्या निकाशाचे पालन विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी अशी मागणी कृषी विभागाची आहे तसा पत्र व्यवहार केला असून आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात हक्काची रक्कम का वर्ग केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे ने केला. आज तागायत ३ हजार कोटी रुपये शेतकऱ्याचे नियमात अडकलेले आहेत. उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय व राज्य सरकारचे आदेश असूनही पिक विमा कंपन्या नियमाचे पालन करीत नाहीत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . पूर्वीचे ईडी व आताचे त्रिमूर्ती सरकारने शेतकरी संकटात सापडल्यामुळे तात्काळ अतिवृष्टीचे व पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे अशी मागणी अनेक वेळा निवेदन देऊन केलेली आहे . शेतकऱ्याला पिक विमा देण्याऐवजी कंपन्यांनीच ४१०० कोटीचा फायदा लुटलेला आहे तरी शासन त्या कंपन्यावर वसुली संदर्भात एफ आय आर व काळया यादी मध्ये टाकण्या बाबत कारवाई का केली जात नाही असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी चे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला .
