अक्षय भालेराव व मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या ; संगमनेरात निळा जन आक्रोश मोर्चा

 

दोषींवर कारवाईसाठी विविध संघटना आक्रमक , निषेधाच्या घोषणा

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निघृण हत्या , मुंबई येथे इंजिनिअरींगची शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार व हत्या या सारखे प्रकार सातत्याने होत आहे .यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शनिवारी (दि ८ जूलै) विविध मागासवर्गीय संघटनेच्या वतीने संगमनेर प्रांताकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मागासवर्गीय समाजावर वेगवेगळया प्रकारे अन्याय अत्याचार होत आहे या विरोधात संगमनेर येथील सर्व मागासवर्गीय संघटना एकत्र येवुन संगमनेर बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा निळ जन आक्रोश मोर्चा काढला . या मोर्चात विजयराव वाकचौरे , आशिष शेळके , माणिकराव यादव , प्रविण गायकवाड , राजू खरात , रविंद्र गिरी , संदिप मोकळ , राम दारोळे , किशोर चव्हाण , बाबा खरात सर , बाळासाहेब गायकवाड , किशोर वाघमारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी भाषणात उपस्थित मान्यवरांनी मागासवर्गीय समाजा वरील हल्ल्याच्या विविध घटनांचा तिव्र निषेध केला. दलितांवरील अन्याय अत्याचार संदर्भात प्रसार माध्यमाव्दारे काही जातीवादी संघटना समाजा समाजामध्ये जातीयतेड निर्माण करीत आहे. सदर मोर्चा हा कुठल्याही जाती अथवा धर्माचे विरोधात नसुन ज्या नराधमाकडुन हया घटना घडल्या आहेत. त्या प्रवृत्तीचे विरोधात हा विराट मोर्चा आहे. सदर मोर्चा हा शातंतेचे मार्गाने असुन मोर्च्याच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहीजे.

नांदेड येथील अक्षय भालेराव व मुंबई येथील हिना मेश्राम यांचे फाशीची शिक्षा व्हावी. मागासवर्गीय सर्वं विद्यार्थ्यांना शासनाने योग्य वेळेत शिष्यवृत्ती मिळावी. भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचेवर जो प्राण घातक हल्ला झाला त्या मारेक-यांना त्वरीत अटक करून कारवाई करावी , गायरान जमीनीवर मागासवर्गीयांनी केलेल्या अतिक्रमणांना नियमीत करावे.महाराष्ट्रातील सर्व महीला वस्तीगृह यांस महीला पोलीस संरक्षण देण्यात यावे. अँट्रासिटी कायद्दाची कडक अंमलबजावणी करावी दोन समाजात तेढ निर्माण करणारे जातीय वादी संघटनावरती कठोर कारवाई यासह विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या . या वेळी घोषणाबाजी करण्यात आली , अधिकार्यांना निवेदन देण्यात आले ,

या मोर्चात  कैलासराव कासार , महेश जेधे , अॅड किरण रोहम, अनिल भोसले , शिवाजीराव जगताप , योगेश मुन्तोडे , राजेंद्र गवांदे , रमेश शिरकांडे , विजय मुन्तोडे , राजेंश गायकवाड , सुभाष भालेराव , सागर शिंदे , सुनिल मुन्तोडे , मंजाबापू साळवे , विनोद पाळंदे , गौतम रोहम , बंटी यादव , सुधाकर कदम , रमेश भोसले , केरनाथ भोसले , संपत भोसले , स्वप्नील कदम , जनार्धन साळवे ,  सौ रुपाली सोनवणे , आदिसह महिला , मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी विजयराव वाकचौरे , आशिष शेळके , प्रविण गायकवाड यांची भाषणे झाली .

 

मोर्चातील विविध मागण्या :

१) नांदेड येथील अक्षय भालेराव व मुंबई येथील हिना मेश्राम यांचे मारेक-यांना व मारेक-यांना सहकार्य करणारे नराधमाना फास्ट ट्रैक कोर्ट मार्फत जलद गतीने न्यायीक मार्गाने फाशीची शिक्षा व्हावी

२) मागासवर्गीय सर्व विद्यार्थ्यांना शासनाने योग्य वेळेत शिष्यवृत्ती मिळावी.. ३) भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचेवर जो प्राण घातक हल्ला झाला त्या मारेक-यांना त्वरीत अटक करून त्यांचेवर कायदेशिर कडक कारवाई करावी

(४) आकोले येथील हिना मेश्राम व मुंबई येथील वसतीगृहात शिक्षण घेणारे मुलीवर
जो अत्याचार होवुन खुन करण्यात आला. तसेच संचालक व मॉडर्न यांचेवर ३०२ चा सह आरोपी म्हणुन समावेश करावा.

५) महाराष्ट्रात असलेल्या गायरान जमीनीवर मागासवर्गीयांनी केलेल्या अतिक्रमणांना नियमीत करावे

 

(६) महाराष्ट्रातील सर्व महीला वस्तीगृह यांस महीला पोलीस संरक्षण देण्यात यावे.

७) अॅट्रासिटी अॅक्ट हा कायदा शहानिशा करून कठोरपणे राबविण्यात यावा.

 

८) दोन समाजात तेढ निर्माण करणारे जातीय वादी संघटनावरती कठोर कारवाई करण्यात यावी.

(९) ख्रिश्चन समाजावर जो कोणी समाजकंटक अन्याय करीत असेल अश्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी.

१०)मागासवर्गीय समाजात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचेवर जे काही खोटे गुन्हे दाखल असतील त्या गुन्हयाची शहानिशा करून राज्य शासनाने ते गुन्हे रदद करावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!