नववी ते बारावी लवकरच सेमिस्टर पद्धत

 

लोकवेध live न्यूज विशेष

आता लवकरच इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिम लागू करण्यात येणार असून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) तिसऱ्या वर्गापासून बारावीपर्यंतचा राष्ट्रीय आराखडा (एनसीएफ) तयार झाला आहे. त्याच्या प्रकाशनाची तयारी सुरू झाली आहे. २९ जुलै किंवा त्याच्या आधी एनसीएफ जाहीर होऊ शकतो. सर्व दहा वर्गासाठी नवीन पुस्तके तयार करण्यासाठी विषयतज्ज्ञांची निश्चिती करण्यात आली आहे. एनसीएफ जाहीर होताच पुस्तके तयार करण्यासाठी समित्यांची स्थापना होईल. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणात आता १५० विषयांची पुस्तके तयार केली जातील. शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या सुरुवातीच्या महिन्यांत नवीन एनईपीनुसार इयत्ता ३ रई, ६ वी आणि नववीची पुस्तके येऊ शकतात. मागील धोरण १९८६ मध्ये आले. पुस्तके २००८ पर्यंत आली. या वेळी २०२० मध्ये धोरण, २ वर्षांत प्री स्कूलची पुस्तके, बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. केंद्रीय विद्यालयांत बालवाटिका प्री-स्कूल वर्ग सुरू झाले. केव्हीएस- एनव्हीएसच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सीबीएसई शाळांत व गुजरातमध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा पथदर्शी प्रकल्पाची चाचणीदेखील झाली. ६० बोर्डात एकरूपता आणण्यासाठी नॅशनल असेसमेंट सेंटर परख’ची स्थापना झाली. पीएमश्री शाळांतर्गत मॉडेल स्कूल विकसित केले जातील.


माध्यमिक व्होकेशनल एक्सपोजर
सहाव्या वर्गात ११ वर्षांच्या मुलास प्रवेश मिळेल. आठव्या वर्गापर्यंत मुलांना व्होकेशनल एक्सपोजर मिळेल. त्याचे मूल्यांकन होणार नाही. भाषा व विज्ञानव्यतिरिक्त मानव्यशास्त्र, विज्ञान, कला, सामाजिक शाखाचा पायाभूत अभ्यास असेल. आठव्या वर्गाच्या अखेरीस तिसरे मूल्यांकन होईल. तिसरा, पाचवा व आठव्या वर्गातील मूल्यांकन बोर्ड परीक्षेसारखी होणार नाही. नियमित समुपदेशन. व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यांकन नवव्या वर्गापासून होईल.
*जन्मापासून तीन वर्षांपर्यंत :* आई-वडिलांसाठीदेखील पहिल्यांदाच अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन अभ्यासक्रम (पालनपोषणाबाबत ) तयार झाला आहे.
*३ ते ८ वर्षे वयोगटास परीक्षा नाही :* बालवाटिका / प्री-स्कूलमध्ये मुलांना जादुई पेटाऱ्यातून ( ५३ प्रकारचे खेळ खेळणी, पोस्टर, बोर्ड, बिल्डिंग ब्लॉक, प्लेइंग (कार्ड) शिकवले जाईल. स्कूल बॅग नसेल. सहा वर्षांच्या मुलास पहिल्या वर्गात प्रवेश मिळेल. त्यात केवळ दोन पुस्तके असतील. भाषा व गणित. दुसऱ्या वर्गानंतर फाउंडेशन लेव्हल पूर्ण होईल.
*९ वीचा निकाल दहावीशी जोडणार :* नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिमने शिक्षण होईल. वर्षात बोर्ड परीक्षेसारख्या दोन संधी मिळतील. नववी-दहावी आणि अकरावी-बारावीमध्ये एकूण १६-१६ पेपर द्यावे लागतील. म्हणजे एक वर्षात किमान ८ पेपर असतील. नववीचा निकाल दहावीच्या अंतिम गुणपत्रिकेत जोडलेला असेल. त्याचप्रमाणे ११ वी मध्ये मिळालेले गुण देखील १२ वी मध्ये जोडले जातील.
*९ वी व १० वीत आठ स्ट्रिम :* मानव्यशास्त्र-भाषा, गणित, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला, सामाजिक शाख, विज्ञान, इंटरडिसिप्लिनरी ग्रुप. या ८ समूहात प्रत्येकातून दोन म्हणजे १६ पेपर निवडावे लागतील. या आठ गटांतून किमान तीन समूहातील चार विषय निवडावे लागतील.
*आता शाखांचे विभाजन नसेल :* संगीत, क्रीडा, क्राफ्टला कला शिक्षण, शारीरिक शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा गणित, विज्ञान, मानव्य, भाषा व सामाजिक विज्ञानासारखाच असेल. रिपोर्ट कार्डऐवजी हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असे म्हटले जाईल.
नववी ते बारावीची परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार असल्याने दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा नसेल असा गैरसमज लोकांनी करून घेतला आहे. परंतु असं नसून या धोरणामध्ये बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबत उल्लेख आहे. जरी परीक्षा या सेमिस्टर पॅटर्नमध्ये झाल्या तरीही बोर्डाच्या अखत्यारितच या परीक्षा होतील.

सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!