निळा मोर्चा मधीलआंबेडकर वादी कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या – अनिकेत घुले छात्रभारती विद्यार्थी संघटना

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

अक्षय भालेराव ची हत्या झाल्याच्या निषेधार्थ संगमनेर या ठिकाणी आंबेडकर चळवळी तील समाजाने मोर्चा काढला म्हणून 21 आयोजक व 100 पेक्षा जास्त मोर्चे करावंर गुन्हा दाखल केला जातो .पोलीस कारण देतात नगर जिल्ह्यात 144 लागू आहे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही म्हणून सांगतात.दोन दिवसांपूर्वी नितेश राणे नगर जिल्ह्यात येऊन भडकावू भाषण करतो .त्यावर पोलीस कुठलीही कारवाई करत नाही .
संगमनेर च्या आंबेडकरी मोर्चा अतिशय शांततेने काढला जातो ,कुणीही भाषण मोर्चात करत नाही , फक्त निवेदन देतात ,कुठल्याही प्रकारची चुकीची घोषणा दिली जात नाही . तरीही पोलीस आंदोलन संपल्यावर रात्री गुन्हा दाखल करतात.भाजप च्या राज्यात अश्या पद्धतीने कारवाई होत आहे ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे .परंतु आंबेडकरी चळवळ ही अत्यंत मजबूत आहे .सरकारने हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी छात्रभारती च्या वतीने करत आहोत.

अनिकेत घुले
राज्य कार्यवाह , छात्रभारती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!