महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी धरणे/साखळी पद्धतीने उपोषण
महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे 32 दिवसापासून उपोषण सुरू
कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी ही मागणी सरकारकडे कृषि अभियंते करत आहेत तरी सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मध्यप्रदेश राज्यात दिनांक १७/१०/२०२२ रोजी स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन होते.कर्नाटक राज्यात कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार???
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठात कृषि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन केले आहे तसे महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे यासाठी गेली ३२ दिवसांपासून धरणे/साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत आजही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. विद्यार्थ्यांची विनंती आहे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करावी व कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
तसेच इतर राज्यात (मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिस, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय) मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखा व स्थापत्य अभियांत्रिकी शाखा समतुल्य आहेत तर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी पदवी असतानाही मृदा व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यां पात्र का नाही? कृषि अभियंत्यांना संधी का दिली जात नाही? कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी ही मागणी सरकारकडे कृषि अभियंते करत आहेत तरी सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही. सरकारने लवकरात लवकर कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
