दै. समर्थ गांवकरी तर्फे शिर्डीत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

शिर्डी – लोक वेध live न्यूज

सामाजिक राजकीय वैद्यकीय तसेच प्रशासकीय व सामाजिक कार्यात ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्या वंचित घटकांना पुरस्कार देवुन त्यांच्या कामाची प्रेरणा वाढविणे. हाच संकल्प दै. समर्थ गांवकरी समुहाने हाती घेवुन या ठिकाणी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अनमोल रत्न निवडूण त्यांचा सन्मान करुन त्यांना एकप्रकारे पुढील कार्यात गतिमान व्हावे हाच संकल्प यावेळी समुहाच्यावतीने संपादक डॉ. विश्‍वास आरोटे यांनी व्यक्त केला. यावेळी साईबाबांच्या प्रतिमेला प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे शिर्डी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप, माजी नगरउपाध्यक्ष निलेश कोते, माजी उपनगराध्यक्ष विजय, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ होते. शिर्डीचे माजी नगरसेवक सचिन चौगुले, शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयराव काळे पाटील साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजु कोते यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सौ. जगताप यांनी दै. स. गांवकरीने आमच्या कार्याची दखल घेवुन सन्मानित केले. यामुळे आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली असली तरी पुरस्कार देणारे, पुरस्कार घेणारे यांची देखील समाजात चर्चा होत असते. हा पुरस्कार आम्हाला गावासाठी गांवकरीने दिलेला प्रेरणादायी देणारा पुरस्कार असुन चुल आणि मुल एवढेच स्त्रीला महत्व होते. आत्ताच्या युगात महिला पुढे जात आहे. आजही महाविद्यालयीन विद्यार्थीनी यांना कॉलेज विविध विद्यालयात पोलीस यंत्रणेने पेट्रोलिंग करुन रोडरोमिओंचा सुळसुळाट बंद करावा, अशी मागणी यावेळी करताच पोलीस सहा. निरिक्षक शिर्डी नगरीतील जगभरातील साईभक्तांना भयमुक्त शिर्डी हा नारा पोलीस खात्याने घेतला असुन येथे कोणाचीही गय केली जाणार नाही, सर्वांना सहकार्य करणार, कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना कायद्याचा बडगा दाखवू.
तर निलेश कोते यांनी लेखनीच्या माध्यमातून धारधार असे शस्त्र पत्रकारांकडे असुन या लिखानातून समाजाला दिशा दर्शक कार्य दै. गांवकरीच्या माध्यमातून सुरु आहे. तर यावेळी अनेक मान्यवरांनी आजच्या उपक्रमाने आमच्या कार्याची दखल घेतली असली तरी आजच्या पुरस्काराने काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीतून सर्वांना एकतेचा संदेश देवुन असेच साई नगरीचे व दै. समर्थ गांवकरीने वंचित घटकाला प्रेरणा दिली याबद्दल सर्वांनी समर्थ गांवकरीचे आभार मानले.
यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे शिर्डीच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांना नारीशक्ती तर आरोग्य सेवेमध्ये आरोग्यदूत म्हणून कार्यकरणारे डॉ. ज्योती मारुती भांडकोळी, डॉ. स्वप्नाली अतुल आरोटे, डॉ. राहुल शंकर वाळे यांना द मिरर मॅन पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोविंदराव कोते पाटील यांना युवा प्रेरणा पुरस्कार तर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना पोलीसरत्न तसेच संदीप गडाख, अविनाश मकासरे, प्रवीण दात्रे यांनाही या सन्मानित करण्यात आले. तसेच गांवकरी भूषण किरण गोंदकर, देवदूत जितेंद्र जाधव, राजरत्न जयवंत कानडे, संघर्षरत्न सुरेश आरणे, साईरत्न महेंद्र शेळके, समाजरत्न प्रदीप बनसोडे, आदर्श समाजसेवक पुरस्कार विजयराव काळे, नवरत्न पुरस्कार विठ्ठलराव पवार, कृषिभूषण भाऊसाहेब कांदे, कर्तव्यदक्ष अधिकारी अतुल वाघ, आदिशक्ती सन्मान सुनिता थोरात, स्त्रीशक्ती सन्मान नीलिमा सोळंकी, आदर्श सामाजिक कार्यकर्ते तुषार सदाफळ, साई कला भूषण रवि दुर्गुडे, शरद शिरोळे, सेवा सिध्दी युवा उद्योग रत्न पुरस्कार आशिष गोरे, पुरस्कार अमोल चिंतामणी, युवा रत्न पुरस्कार किरण कोते, युवा समाजसेवक पुरस्कार विशाल वाघे, कृषी भूषण रमेश जगताप, दक्ष पत्रकार राजकुमार जाधव, विष्णू थोरात, साई शताब्दी रत्न रमेश गोंदकर, गांवकरी आयकॉन कमलाकर कोते, तर कृषीभूषण विलासराव कालेकर, राम ज्ञानदेव डेंगळे, संघर्षरत्न कानिफनाथ गुंजाळ, देवळाली – प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुनीताताई थोरात यांना स्त्री शक्ती सन्मान, कृतज्ञ पुरस्कार दत्तात्रय खोसे, लक्ष्मण झाडे या सर्वांना शिर्डी येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दैनिक समर्थ गांवकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर, राहता तालुका प्रतिनिधी जितेंद्र जाधव, राजकुमार जाधव, प्रतिनिधी राहुल फुंदे, विनोद जवरे, दत्तू खोशे, लक्ष्मण झाडे आदी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत राजेश जाधव यांनी तर सुत्रसंचालन राहुल फुंदे यांनी यावेळी आभार व्यवस्थापक संजय फुलसुंदर यांनी मानले.

चौकट – यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सौ. स्वप्नाली आरोटे यांनी नारीची शक्ती मनघटातच असते म्हणतात याचा प्रत्यय प्रत्येक वेळी दिसून आला. लेक ही लाडाची असते, तिचा बाप तिच्या आवडीने सांभाळ करत असतो, नंतर तीन पत्नी, आई या रुपात असते,  ते निभावताना ती समाज कार्य करण्यास कधीच मागे पुढे पाहत नाही. हा पुरस्कार साईबाबांच्या पुण्यभूमीत मिळाला. हे प्रत्येकाने मनी धरुन पैशाच्या पाठिमागे न धावता येणारा जो काळ आहे. तो आपल्या वाणीने व समाज कार्याने नक्कीच सर्वांना पुढे नेणारा ठरेल असे, डॉ. सौ. आरोटे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!