मुक्या जनावरांना शहरात राहण्याचा अधिकार नाही का?
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
मनुष्यप्राणी हा सहजीवनाला महत्त्व देतो. त्यामुळे तो वृक्षवल्ली लावतो व जोपासतो तसेच कुत्री मांजरे पाळतो व त्यांच्यावरही प्रेम करतो. परंतु गेल्या काही वर्षात मनुष्य स्वभावात खूपच बदल झालेला बघायला मिळतो. अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होताना आपण पाहत आहोत. तसेच संवेदना सुद्धा त्याच्या मरत चालले आहेत याचा अनेक वेळा अनुभव येतो.
मागील 14 तारखेला पाइप लाईन रोड येथील सम्राट अपणा घर येथील सोसायटी च्या लोकांनी सोसायटी च्या आवारात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याला अमानुषतेचे जिवानिशी मारले.त्या विरोधात काही प्राणी प्रेमींनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देखील केली पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.म्हणून काल काही प्राणी प्रेमी मुक्या प्राण्याला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस आयुक्तलयात जाऊन आयुक्तांची भेट घेतली.आणि त्यांना लेखी तक्रार लिहून दिली.सोबत त्यांनी व्हिडिओ स्क्रीन शोट फोटोज् ह्या पुरव्यान सहित तक्रार दाखल केली.मुक्या जनावरांवर पुन्हा असे अत्त्याचार होऊ नये म्हणून प्राणी प्रेमींनी हे पाऊल उचलले.
भटक्या कुत्र्यांचे कीव इतर प्राण्यांचे पालकत्व महानगरपालिकेचे आहे.त्यामुळे त्यांच्याविषयी काही तक्रार असल्यास पालिकेकडे तक्रार करून मार्ग काढता येतो.
भटका म्हणतात कुत्रा हा मुळात भटका नसून तो त्याच भागात राहणारा असतो.
ज्या परिसरातून त्याला अन्न मिळते त्याच परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी तो न सांगता त्या बदल्यात घेत असतो.
ज्या व्यक्तींना मुळात च कुत्र्यांचा फोबिया असतो त्या व्यक्ती भीती पोटी असा अमानुष्टेकडे झुकतात.त्यांच्या भीती वर्तनातून कुत्र्याला चुकीचा संदेश मिळतो आणि तो ही स्वा रक्षणासाठी वेळ प्रसंगी भुंगतो ही.
महानगरपालिका च्या मालकीतील इतर वस्तूंना नुकसान करा तर पालिका दंड लावते…गुन्हा दाखल करते.मग ज्या प्रणाण्याचे पालकत्व नगरपालिका कडे आहे त्या प्राण्या ला अमानुष पण मारले तर पालिकेने स्वतः पुढाकाराने गुन्हा दाखल केला पाहिजे.
जबाबदार अधिकाऱ्यांनी योग्य ते मार्ग काढावे असे की प्राण्यांमुळे माणसांना धोका निर्माण होणार नाही.. आणि प्राणी सुद्धा सुरक्षित राहतील.. नुसतेच प्राणिप्रेमींना दोष देऊ नका हो, अख्ख पशुसंवर्धन नावाच खातं या साठी कार्यरत असत या साठी, कोट्यवधी रुपयांचा निधी देखील येत असतो. शहरातील मोकाट कुत्रे पकडणे पण त्यातच येत.. कुत्र्यांना जीवे ठार मारणे हा पर्याय अजिबात नाही.
