शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार! भाजपकडून तयारी पूर्ण ! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

मुंबई / लोकवेध live न्यूज 

 

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार, भाजपकडून तयारी सुरू आहे. असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून बंडखोरी करत युती सरकारला पाठिंबा दिला. दरम्यान, अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री होताच शिंदे गटात नाराजी पसरल्याची चर्चा आहे.शिंदे गटातील बहुतांश आमदार या निर्णयावर नाराज असल्याचं बोललं जातंय. अशातच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार, भाजपकडून तयारी सुरू आहे. असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.खासदार विनायक राऊत रविवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आगामी कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे. ते कितीही एकत्र आले, कितीही गळाभेटी घेतल्या, तरीही महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार असल्यामुळे महाविकास आघाडीचाच विजय होईल, असं विनायक राऊत म्हणाले.दरम्यान, विनायक राऊत यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील मोठं भाष्य केलं. “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आपण मागच्या अनेक महिन्यांपासून बोलत आहोत. त्यांची (शिंदे गट) कितीही पोपटपंची सुरू असली तरी मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. भाजपा त्यांना मंत्रीमंडळ विस्तार करू देणार नाही, असं विनायक राऊत म्हणाले.त्याचबरोबर भाजपाकडून एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्या गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली आहे, असं विधान देखील विनायक राऊत यांनी केलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. पण आम्ही त्यांच्यासाठी अजून दरवाजे उघडलेले नाहीत. ते गद्दारी करून तिकडे गेलेत, त्यांची गद्दारी त्यांना लखलाभ होऊ द्या, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!