पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्या – सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे कामाला लवकरात लवकर सुरुवात करून द्यावे त्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्याला त्याचा चांगला फायदा होईल या रेल्वे मार्गाच्या कामाला युद्ध पातळीवर सुरू करून द्यावे यासाठीचे निवेदन संगमनेर सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिले त्यांनी निवेदनात म्हटले की
 पुणे व्हाया, संगमनेर, नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामाला गती द्या. युध्द पातळीवर काम सुरु करुन लवकरात लवकर पुर्ण करावे. पुणे जिल्हा, संगमनेर जिल्हा, नाशिक जिल्हा हायस्पीड रेल्वेने एकमेकांना जोडून विकासाची एक मोठी पहाट सुरु करावी. संगमनेरच्या पठारावर मोठी औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी. घारगांवला तालुक्याचा दर्जा व शिवाय साकूर फाटयावर, गुलटेकडी, पुणे, यासारखी मोठी बाजार समिती शेतक-यांसाठी व औद्योगिक वसाहत व्यापारासाठी मोठे वरदान ठरणारी असून त्यामुळे नोक-या, रोजगार संधी मिळून ५ लाख लोकांना रोजगार व कॉम्प्लीमेन्टरी उद्योगधंदे अस्तित्वात येवून विकासाची मोठी संधी आहे. त्यामुळे ५ लाख लोकांच्या हाताला काम मिळू शकते. शिवाय सरकारने मुळा नदीवर मोरवाडी धरण अन्य पर्याय शोधावे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!