द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे अंध व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व लायन्स क्लब नाशिक स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे कार्यालय शालिमार येथे ठीक 11:00 वाजता मान्यवरांच्या हस्ते 65 व्यक्तींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये वह्या, रजिस्टर, चित्रकला वही, कंपास, पाणी बॉटल आदींचा समावेश होता. यावेळेस लायन्स क्लब च्या वतीने क्लबच्या अध्यक्षा सौ. अश्विनी बाग, अभय बाग, अध्यापक साहेबराव कांगुणे हे उपस्थित होते. यावेळी श्री बाग यांनी आपल्या मनोगतातून त्यांनी एका विद्यार्थ्यांना शिकत राहावे असे प्रेरणा दायी विचार व्यक्त केले. तर अध्यक्षा लायन अश्विनी बाग यांनी देखील आपण हा कार्यक्रम बघून भारावून गेलो व भविष्यात या संस्थेला भरीव मदत करू अशी ग्वाही दिली. ( युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र ) श्री कागुणे सर व श्री निलेश शेकोकार ( लोकवेध लाईव्ह न्यूज, न्यूजशोधांश न्यूज, युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र ) नाशिक यांनी देखील संस्थेचे कार्य मला मागील 15 वर्षापासून माहीत असून ज्या ज्या वेळेस संस्थेला माझी गरज वाटेल त्यावेळेस त्यांनी मला आवश्यक आवाज द्यावा अवश्य अडचण सांगावी, मला जे शक्य असेल ती मदत मी करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अध्यक्ष अरुण भारस्कर, कोषाध्यक्ष विजया डबे मराठे, संचालक भगवान पवार व रेचल शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!