परंडा शहरांमध्ये 24 वा कारगिल विजय दिवस संपन्न
माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
परंडा शहरांमध्ये बावची चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 24 वा कारगिल विजय दिवस संपन्न करण्यात आला. यावेळी त्रिदल माजी सैनिक संघटना व कमांडो करिअर अकॅडमी यांच्या वतीने परांडा शहरातून माजी सैनिक व कमांडो करिअर अकॅडमी चे विद्यार्थीयांची रॅली काढून कारगिल विजय दिवस संपन्न करण्यात आला . यावेळी परंडा शहराचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
24 व्या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून परंडा तालुक्यातील सोनारी गावचे शहीद जवान सागर तोडकरी आणि टाकळी गावचे शहीद जवान वामन पवार यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या मातापित्याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . परंडा पंचायत समितीचे Bdo संतोष नागटिळक परांडा आणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ परांडा तहसीलचे सर्कल पवार व तलाठी चंद्रकांत कसाब अतुल गोपने गोवा व महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष आॕडव्होकेट मिलिंद पाटील , जहीर चौधरी , गौतम लटके संजय कुमार बनसोडे मेघराज पाटील राहुल बनसोडे सुबोधसिंह ठाकूर, गुरुदास कांबळे आणि त्रिदल माझी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान लिमकर , तालुका अध्यक्ष तुकाराम चव्हाण ,तालुका उपाध्यक्ष सिद्धेश्वर गुडे, संभाजी पाटील , परमेश्वर सोनवणे , भालचंद्र क्षीरसागर , राजेंद्र शिंदे , सुभेदार बल्लाळ , आणि परंडा माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडवे , कमांडो अकॅडमी मेजर तनपुरे, कॅप्टन भाऊसाहेब चव्हाण, बापू रुपनवर , सुभाष अवसरे , धनाजी नरसाळे , यशवंत शिंदे यांच्यासह तालुक्यातील आजी माजी सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते..
