पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण  करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने मागणी.

 

माढा / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी परंडा तहसीलदार यांना निवेदन.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीया च्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे. असी मागणी करण्यात आली व पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून द्यावा लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रकाश काशीद,प्रमोद वेदपाठक, तानाजी घोडके, संतोष शिंदे, मुझीब काझी, श्रीराम विदवत, समीर ओव्हाळ, फारुख शेख, धनंजय गोफणे, सजीद शेख.निवेदनावर आदी पत्रकाराच्या सहया आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!