खासापुरी गावच्या ग्रामस्थाचं महावितरण कार्यालाय समोर उपोषण.
परंडा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
परंडा तालुक्यातील खासापुरी फिडरवर असलेले नऊ गावाचे लोड विभागणी करण्यासाठी 40 पोल उभा करून लिंक लाईन उभारणीसाठी खासापुरी गावचे, शंकर चव्हाण यांनी अमरण उपोषण सुरू केले होते.
चौथ्या दिवशी परंडा शहरातील डॉक्टरची टीम उपोषण करणारे कार्यकर्त्याची आरोग्य तपासणी केली असता शंकर चव्हाण यांची प्रकृती गंभीर झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात परंडा येथे दाखल करण्यात आले उस्मानाबाद विभागाचे कार्यकारी अभियंता जोगदंड यांनी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन उपोषण करते शंकर चव्हाण यांची भेट घेतली त्यावेळी परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार , उस्मानाबादहून आलेले महावितरणचे जोगदंड व वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी उपोषण करतेस विनंती केली उपोषण मागे घ्या थोड्या दिवसाचा अवधी द्या त्यावेळी उपोषण करते म्हणाले की काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही त्यावेळी परांडा महावितरण चे अभियंता अंकुलीकर , शाखा अभियंता रोकडे , पोलीस निरीक्षक विनोद इजपवार , पोलीस कॉन्स्टेबल शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल मनोज यादव व आरोग्य विभागाचा स्टाफ व उपोषण शेतकरी उपस्थित होते ..
