नाफेड मार्फत कांदा खरेदी बाबत अटी व शर्थी कमी करून संगमनेर तालुक्याला तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा :- संगमनेर शहर व तालुका शिवसेनेची (ठाकरे) मागणी

 

संगमनेर / लोकवेध / live न्यूज /अण्णासाहेब काळे

 

अन्नदाता शेतकऱ्यांना शासना मार्फत न्याय मिळवून द्यायला भाग पाडू शहरप्रमुख अमर कतारी आक्रमक, नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्यासाठी सर्व अटी शिथिल कराव्यात भाऊसाहेब हासे शिवसेना तालुकाप्रमुख

संपूर्ण संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन,मका कापुस ,भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली चारायोग्य सुद्धा राहिली नाही तसेच तालुक्यात पाण्याची सुध्दा टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा सुध्दा शिल्लक राहिला नसून शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हा राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन “संगमनेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई घ्यावी” व ज्या गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा गावांना टॅंकर मार्फत पाणी पुरवठा चालू करण्यात यावा. लम्पी आजार राज्यात वाढत असल्याने आपणास छावणी देता येणार नाही तेव्हा प्रत्येक गावात तात्काळ चारा तात्काळ देण्यात यावा ह्या आग्रही मागण्यानसोबतच नाफेडमार्फ़त सुरु असलेले कांदा खरेदी केंद्रा बाबत मागणी करतं नाफेडच्या जाचक आटी व शर्थी शिथिल करून नियम बदलण्यात यावेत व
तमाम शेतकरी बांधवांना या दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन भरिव मदत करावी. अशा आशयाचे निवेदन संगमनेर शहर व तालुका शिवसेना (ठाकरे) यांच्या मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले असून संगमनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नाफेडच्या अटी शिथिल करण्याची मागणी आम्ही करत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार सर्व शिवसैनिक हे शेतकरी बांधवांच्या सोबत उभे असून प्रशासनाने न्याय देण्याची विनंती करतो असे अमर कतारी यांनी सांगितले. तसेच आम्ही सदरील निवेदन देऊन आपणांस नम्र विनंती करत आहोत. राजकारण न करता आपण आमच्या मागणीकडे त्वरित सहानुभूतीपूर्वक विचार करावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा ही कळकळीची विनंती करतो असे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सांगितले.

यावेळी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे शिवसेना शहर प्रमुख अमरकतारी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे युवा सेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख परवेज शेख विभाग प्रमुख विजय भागवत शहर संघटक दीपक साळुंखे शिवसेना तालुका सचिव संदीप राहणे सचिव कचरू पाटील वारुंगशे उपतालुकाप्रमुख शरद कवडे युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी इम्तियाज शेख ,दीपक वन्नम ,शाखाप्रमुख प्रकाश चोथवे रहीम बेग, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे ब्रह्मा खिडके प्रशांत खजुरे त्रिलोक कतारी व शिवसैनिक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!