आ.थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॅप्पी हायवेवर लखलखाट
संगमनेर / लोकवेध live न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला हॅप्पी हायवेवर आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाला असून संगमनेरकरांच्या आनंदात भर पडली आहे.
गणेश उत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व संगमनेरकरांनी एकत्र येत हॅप्पी हायवेचा लोकार्पण सोहळा भर पावसात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला.

यामध्ये शहरातील बालक, नागरिक, युवक, महिला अत्यंत आनंदाने सहभागी होऊन रस्त्याच्या दुतर्फा सजावट करून सर्वांनी रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात व भर पावसात फटाक्यांच्या आतिषबाजीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला यामध्ये झुम्बा डान्स, लेझीम, कबड्डी ,लावणी नृत्य, पारंपारिक ड्रेपरी,  तायकोंदो,रांगोळी अशा विविध स्पर्धांमधून अनेकांनी हॅप्पी हायवेचा संस्मरणीय सोहळा अनुभवला.

मात्र पालकमंत्री व भाजपाच्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेर करांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकला.तमाम संगमनेर करांनी मागणी करूनही अनेक दिवस विद्युतीकरणाचे काम रखडवले.

आगामी काळ हा सणासुदीचा काळ आहे .नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी या काळामध्ये संगमनेर करांच्या आनंदात भर पडावी व कायमस्वरूपी या रस्त्यावर लाईट असावी याकरता आमदार थोरात यांनी पुन्हा वरिष्ठ पातळीवरून वीज विभागाला सूचना दिल्या यानंतर आज सायंकाळी संपूर्ण हॅप्पी हायवेवर लखलखाट झाला. आणि संगमनेर करांनी हा रोमांच अनुभवला अनेक तरुणांनी या रस्त्यावर बाईक राईड केल्या.

यावेळी अनेक महिला युवक व नागरिक यांनीही रस्त्यावर येऊन या प्रकाश सोहळ्याचा आनंद घेतला. या चांगल्या कामात काही लोकांनी केलेले राजकारण हे अत्यंत दुर्दैवी होते मात्र शेवटी सत्याचा विजय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.


सोशल मीडियावर हॅप्पी हायवे ची धूम

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरातील हॅप्पी हायवेवर झालेल्या झगमगटाची सोशल माध्यमाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर धूम झाली. अनेकांनी या हॅपी हायवे ला संगमनेरचा मरीन ड्राईव्ह म्हणत विविध रिल्स बनवल्या. तर आय लव संगमनेरकर ही टॅगलाईन सर्वत्र झळकत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!