पर्यावरण संवर्धन काळाची गरज-राजश्री साळवे.

सर्वोदय विदया मंदिरात वन्यजीव सप्ताह साजरा.

पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज

पर्यावरणात होणारे प्रदुषण,जंगलतोड,हवामान बदल,पाण्याची कमतरता,जैवविविधतेचा ऱ्हास यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासाळत चालला आहे.यामुळे वन्यजीवांचे अस्तीत्व धोक्यात येत आहे.म्हणुनच पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी केले.
करू जागर दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींच्या जनजागृतीचा.वने,वन्यजीव,जीवन वाचवू या.सहजीवन हवे,हिरव्या वृक्षांवर वन्यप्राणी हवे,चला वन्यजीवांच्या अधिवासांचे रक्षण करू या.या संकल्पनेतुनच अकोले तालुक्यातील राजुर येथील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात महाराष्ट्र शासन वनविभाग अहमदनगर वनपरिक्षेत्र अधिकारी राजुर(भवका)वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.याप्रसंगी राजश्री साळवे प्रबोधनपर विचारमंच्यावरून बोलत होत्या.
यावेळी वनपाल योगेश डोंगरे,सर्पमित्र धनंजय मोहिते,किरण शिंदे,विवेक देठे,वनरक्षक शंकर बेणके, भास्कर जाधव,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,संजय देशमुख यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
राजश्री साळवे यांनी पुढे मार्गदर्शन करताना वर्तमानकाळात जिवन जगत असताना भविष्यकाळाच्या गरजा अबाधीत ठेवल्या तरच वन्यजीव संवर्धन होईल हा खरा पर्यावरणीय शाश्वत विकास असल्याचे विचार व्यक्त केले.
सर्पमित्र धनंजय माहिते यांनी सर्पाचे प्रकार,सर्पदंश झाल्यावर घ्यावयाची काळजी,प्रथमोपचार व उपाय याची सविस्तर माहिती दिली.विदयार्थ्यानी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
वनपाल योगेश डोंगरे यांनी पृथ्वीवर लाखो प्रकारच्या वनस्पती,प्राणी,पशु,पक्षी आहेत.त्यांचे रंग,रूप,आकार,गंध यांमध्ये भिन्नता असते.परंतु निसर्गातील भिन्न घटकांचा एकमेकांशी खुप घनिष्ट संबंध असतो असे विचार व्यक्त केले.
प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी आपल्या आजुबाजुला असलेल्या पर्यावरणाचा समतोल तसेच सर्व सजीव सृष्टीतील घटकांचे अस्तित्व व जैवविविधता यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे विचार प्रतिपादित केले.
राजेविनोद साबळे यांनी वन्यजीव सप्ताहाची पार्श्वभूमी सांगुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळी किती महत्त्वाची भूमिका पार पाडते याविषयी प्रबोधन केले.
यावेळी विदयालयात निबंध स्पर्धांचे आयोजन करून पहिले तिन क्रमांक काढण्यात आले.लहान गटात आयुष साबळे प्रथम,धनश्री क्षिरसागर द्वितीय, श्रावणी शिंदे तृतीय तर मोठ्या गटात गोरक्ष लहामगे प्रथम,अनुष्का नंदवाणी द्वितीय,समिक्षा सदगिर तृतीय क्रमांक मिळविले.या क्रमांकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यासाठी संजय व्यावहारे व सिमा बिडवे यांनी परिक्षणाचे काम पाहीले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन दिपक पाचपुते यांनी केले.तर बि.एन.विटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!