ना. बाळासाहेब थोरात क्रिकेट प्रीमियम लीगचा संगमनेरात थरार

नामदार चषकात 16 संघाचा सहभाग

संगमनेर (प्रतिनिधी) लोकवेध live न्यूज 

संगमनेर हे उपक्रमशील शहर व तालुका आहे. तरुणांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने सलग नव्या वर्षी ना. बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग अंतर्गत नामदार चषक सुरू झाला असून संगमनेर मधील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने या लीगचा थरार अनुभवत आहेत

जाणता राजा मैदान येथे राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग नामदार चषकाचा शुभारंभ कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील ब्लड कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. हसमुख जैन यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेला माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,राजेश भाऊ मालपाणी , सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीत सिंह देशमुख, यांनीही भेट दिली आहे

या प्रीमियर लीग मध्ये साई छत्रपती राहुल राऊत 11, महेंद्र शेठ गोडगे पाटील तळेगाव, आयुष वडगाव पान, अजय फटांगरे 11 सारोळे पठार, मोरया चिकणी ,योद्धा साई ट्रेडर्स, संगमनेर राजे उमाजी नाईक, गौरव डोंगरे 11 बोटा, रुद्र 11 कोल्हेवाडी शिरसाट स्पोर्ट्स मनोली ,राजे उमाजी नाईक वेल्हाळे ,त्रिमूर्ती वॉरियर्स वडगाव पान ,आदर्श साईराज, साई रत्न जय भद्रा राजापूर, खंडू अण्णा सुकेवाडी, साकुर नाईट रायडर या 16 संघांनी आयपीएलच्या धरतीवर सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगाचा पोशाख असून जाणता राजा मैदानावर भरगच्च उभारलेले स्टेज, मैदानाच्या चोहोबाजूंनी केलेले सुशोभीकरण, आकर्षक बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, एलईडी स्क्रीन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळाडूंसाठी स्वतंत्र पवेलियन ,याचबरोबर बाहेरून आलेल्या संघांसाठी राखीव कक्ष ,राष्ट्रीय स्तरावरील पंच आणि या सामन्यांचे प्रक्षेपण यामुळे ही स्पर्धा जिल्हा पातळीवर भव्य दिव्य असणारी पहिली मोठी स्पर्धा ठरली आहे.

श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

या स्पर्धेत के.के थोरात यांनी 1,21,111  रुपये व चषक पारितोषिक दिले असून द्वितीय 71,111 व चषक, डॉ निजानंद खामकर व शतानंद खामकर यांनी दिले आहे. तृतीय  पारितोषिक 51, 111 व चषक आr. एम कातोरे व इंजिनियर निखिल कातोरे यांनी दिले आहे. आणि चतुर्थ बक्षीस 33,333 व चषक अजय फटांगरे यांनी दिले आहे .याचबरोबर विजेता संघ मालकाला राजेश मालपाणी यांच्याकडून पल्सर गाडी, उपविजेत्या संघ मालकाला नवनाथ आरगडे यांच्याकडून एलईडी टीव्ही आणि तृतीय क्रमांकाच्या संगमालकाला दीपक करंजकर यांच्याकडून रेसर सायकल दिली जाणार आहे. याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, षटकार,  हॅटरीक, सर्वोत्कृष्ट आयडॉल, उत्कृष्ट संघ अशी विविध पारितोषिकही दिले जाणार आहेत. पहिल्या दिवशी या स्पर्धेत त्रिमूर्ती वॉरियर वडगाव पण संघाने आदर्श साहित्यरत्न जय भद्रा राजापूर वर सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवला.

षटकारा चौकारांच्या आतिषबाजी ढोल ताशांचा गजर यामुळे संगमनेर करांना आयपीएलचा थरार अनुभवायला मिळत आहे

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!