कनोलीत जरांगे पाटलांच्या उपोषणास गाव बंद ठेवून पाठिंबा  : तसेच प्रकृती ठणठणीत राहण्यासाठी देवळात महाआरती
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुक्यातील कनोली येथे जरांगे पाटलांच्या उपोषणास गाव कडकडीत  बंद ठेवून पाठिंबा दिला तसेच प्रकृती ठणठणीत राहण्यासाठी देवळात महाआरती हि घेण्यात आली

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील  यांचे अमरण उपोषण  सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा संगमनेर तालुक्यातील कनोली येथील ग्रामस्थ जाती-धर्मातील नागरिकांनी या उपोषणास गाव बंद ठेवले तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत जरांगे पाटलांच्या आरोग्याविषयी गावातील हनुमान मंदिर येथे महाआरती करून प्रकृतीला सुरक्षित राहावी अशी प्रार्थना देवाकडे केली यावेळी फक्त मराठा समाजाचे नव्हे तर गावातील प्रत्येक जातीतील युवक ग्रामस्थ एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळावा अशी मागणी सरकारकडे  केली तसेच गावातील शेतकरी कष्टकरी व्यावसायिक दुकानदार यांनी आपले काम बंद ठेवून  पाठिंबा दिला यावेळी ग्रामस्थांनी गावातील छत्रपती चौकात एकदिवशीय उपोषण करून जरांगे पाटलांबरोबर आम्ही आहोत अशा घोषणा दिल्या

 यावेळी बंडू वर्पे सतीश वर्पे मिनीनाथ वर्पे प्रकाश वर्पे लहानभाऊ वर्पे सरपंच भाऊसाहेब पवार ज्ञानदेव वर्पे दत्तू वर्पे मदन वर्पे राजेंद्र सयाजी वर्पे सुरेश झावरे छबुराव वर्पे मुरलीधर वाबळे सुरेश कांबळे बाळासाहेब वर्पे आदीसह गावातील नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!