साकूरात सकल मराठा समाजाचा सर्वधर्मीय समाजाचा कॅन्डल मार्च

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

गरजवंत मराठ्यांचा लढा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ काल संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागाच्या सकल मराठा समाज व सर्वधर्मीय समाज बांधव यांच्या वतीने साकुर चौफुली या ठिकाणी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पठार भागातील सर्वधर्मिय समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

साकूर मधील गजबजलेल्या चौफुली रस्ता ते विरभद्र देवस्थान पर्यत या कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाज बांधव आणि सर्वधर्मीय समाज बांधव यावेळी मोठया संख्येने सहभागी झाले होते.मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाच्या घोषणांनी साकुर परिसर दणाणून सोडला.
प्रसंगी विरभद्र महाराजांच्या चरणी उपस्थित सर्वांच्या वतीने मराठा आरक्षण जीआर लवकरात लवकर काढण्यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्या आणि मनोज जरांगे पाटील यांना लढण्यासाठी बळ द्या अशी प्रार्थना सर्व धर्मीय समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आली.
तसेच कुणबी-मराठा आरक्षण जीआर निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पेढे तुला करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित सर्वच बांधवांनी केला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर,महिला व बालकल्याण सभापती सौ.मीरा शेटे , कादंबरीकार ह.भ.प. शिवाजी महाराज दाते,साकूरचे सरपंच सचिन सोनवणे, जांबुतचे सरपंच सोनाली शेटे,नांदुर खंदरमाळचे सरपंच गणेश सुपेकर,रणखांबचे उपसरपंच हौशीराम खेमनर,
शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष.राहूल ढेंबरे,मानवाधिकार आयोग राज्य प्रचारक विठ्ठल ढेंबरे, ह.भ.प. संदीप महाराज नाईकवाडी, बबन सागर, उत्तम भोसले,दत्तात्रय ढेंबरे, पोलिस संदीप भोसले, ह.भ.प.रूपेश महाराज नाईकवाडी, ह.भ.प.रूपेश महाराज नाईकवाडी, रफीक चौगुले,सुदाम सागर, रामदास सागर,आण्णासाहेब ढेंबरे, बाजीराव ढेंबरे,भास्कर ढेंबरे, योगेश भागवत,रमेश शेटे, नानासाहेब ढेंबरे,तुषार ढेंबरे, निलेश सागर,गोरख सागर,डॉ योगेश ढेंबरे, प्रविण ढेंबरे, अभिजित नान्नर,शकील शेख, सुरेश भोसले, बाळासाहेब क्षिरसागर, तुषार सागर, आदींसह
पठारभागातील बहुसंख्य ग्रामस्थ, महिला ब्रम्हलीन माणिकगिरीजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!