रहिमपुरात  सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवशीय साखळी उपोषण  
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
 गरजवंत मराठ्यांचा लढा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संगमनेर तालुक्यातील रहिमपूर गावातील  सकल मराठा समाज व सर्वधर्मीय समाज बांधव यांच्या वतीने हनुमान मंदिरासमोर एकदिवसीय उपोषण  करण्यात आले .यावेळी गावातील सर्वधर्मिय समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
एक मराठा लाख  मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाज बांधव आणि सर्वधर्मीय समाज बांधव यावेळी मोठया संख्येने सहभागी झाले होते.मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाच्या घोषणांनी गाव व परिसर दणाणून सोडला.
प्रसंगी हनुमान चरणी उपस्थित सर्वांच्या वतीने मराठा आरक्षण जीआर लवकरात लवकर काढण्यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्या आणि मनोज जरांगे पाटील यांना लढण्यासाठी बळ द्या अशी प्रार्थना सर्व धर्मीय समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
 यावेळी भाऊसाहेब शिंदे आबासाहेब शिंदे अण्णासाहेब शिंदे सिताराम शिंदे दत्तात्रेय शिंदे रामनाथ शिंदे सरुनाथ शिंदे बाळगिरी गोसावी लक्ष्मण शिंदे दत्तू खुळे बाजीराव वाळुंज शिवाजी शिंदे धनराज शिंदे मारुती साबळे एडवोकेट चांगदेव वाळुंज संतोष गुळवे बाजीराव शिंदे सतीश शिंदे दादासाहेब गुळवे सुनील गुळवे नानासाहेब शिंदे रामनाथ साबळे लक्ष्मण गुळवे खंडू गुळवे शांताराम शिंदे विलास गुळवे रवींद्र गुळवे बाळासाहेब गोसावी अण्णासाहेब शिंदे जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब शिंदे आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!