फोनवरून सर्वांची आस्तेवाईकपणे चौकशी करत आंदोलनास पाठिंबा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर बस स्थानक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने खंडू सातपुते ,अभिषेक थोरात, अमित गुंजाळ व अक्षय भालेराव यांनी अमरसन आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळाला आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.
याचबरोबर राज्यभरात सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच आरक्षणाबाबत काही अडचणी असतील तर विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्ये त्वरित पूर्तता करून आरक्षण द्यावे अशी मागणी ही यापूर्वी काँग्रेसने आमदार थोरात यांनी केली आहे. कुठेही आंदोलनाला गालबोट लागेल असे कृत्य मराठा बांधवांनी करू नये असे आवाहनही राज्यभरातील मराठा बांधवांना केले आहे
संगमनेर मधील सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांसोबत दूरध्वनीद्वारे आमदार थोरात यांनी संवाद साधला आहे. याचबरोबर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. शांततापूर्ण वातावरण होत असलेल्या या आंदोलनासोबतच उपोषणकर्त्यांनी आपल्या तब्येतीची ही काळजी घ्यावी अशा सूचनाही खंडू सातपुते, अमित गुंजाळ ,अक्षय भालेराव व अभिषेक थोरात यांना आमदार थोरात यांनी दिल्या आहेत.
यानंतर खंडू सातपुते म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले आहे. कधीही पक्षपातीपणा न करता निवडणुकीनंतर सर्वांना समानतेची वागणूक दिली आहे. राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असलेले आमदार थोरात यांनी उपोषण स्थळाला भेट देण्याबरोबर मुंबईत असूनही आमची काळजीपोटी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. यामुळे आम्हाला मोठी ऊर्जा मिळाली आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी अत्यंत शांततेने तालुक्यात अनेक गावबंदसह आंदोलन सुरू केले आहे .या संपूर्ण आंदोलनाला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करताना आ बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या चौकशी बद्दल त्यांना संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने धन्यवाद ही दिले आहेत.
