रणजीतदादा स्पोर्टस क्लबने पटकविला “रणजीत करंडक”
शिरापूर उपविजेता संघ : जिल्ह्यासह बाहेरी जिल्ह्यातील 40 संघाचा सहभाग
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे रणजीत स्पोर्टस क्लब व रणजितदादा युवा मंच यांच्या वतीने रणजितदादा करंडाकाचे 16 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील ४० संघांनी भाग घेतला होता जवळपास सहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध संघांनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवला या स्पर्धेचा अंतिम सामना शिरापूर क्रिकेट क्लब विरुद्ध रणजितदादा क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये खेळला गेला सहा षटकांच्या या सामन्यात शिरापूर संघाने प्रथम फलंदाजी करीत 43 धावा पटकाविल्या रणजीतदादा संघापुढे 44 धावांचे उद्दिष्ट ठेवले रणजितदादा संघाने 44 धावांचे उद्दिष्ट केवळ एक गडी गमवत चार षटकातच गाठलं व नऊ गडी राखून हा सामना शानदार पद्धतीने जिंकला
यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम कैलास काळे राजेंद्र देशमुख नवनीत देशमुख अजित देशमुख विनोद साळवे मंजाबापू साळवे धनंजय वाकचौरे संजय बागुल संतोष देशमुख कल्याणराव जोरवेकर श्रीकांत बागुल अॅडव्होकेट किरण रोहम अजित मांडे आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 41 हजार रुपये व रणजित दादा करंडक, रणजीत दादा संघाने तर द्वितीय 21 हजार रुपये व चषक शिरपूर संघाने जिंकले तृतीय पारितोषक रोख रक्कम11 हजार रुपये व चषक नाशिक येथील देवळाली कॅम्प संघाने पटकवले तर चौथे पारितोषिक रोख रक्कम पाच हजार रुपये व चषक वडगाव पिंगळा नाशिक या संघाने पटकावले
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रणजीतदादा स्पोर्टस क्लबचे धनंजय देशमुख तुषार देशमुख हर्षल काळे मयूर काळे मयूर देशमुख अक्षय खंडागळे अमोल राहींज सुमित देशमुख विक्रम देशमुख अविनाश खंडागळे विराज अभंग प्रदीप मांडे ओम खंडागळे राहुल खंडागळे ऋषिकेश खंडागळे सिद्धार्थ साळवे श्रीपाद मांडे आकाश खंडागळे ऋषिकेश भुसारी, गंगा मावस आदी सदस्यांनी परिश्रम घेतले
