संगमनेर पोलिस स्टेशनचे भगवान मथुरे नवे पोलिस निरीक्षक
वादग्रस्त आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करत जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल… 
संगमनेर तालुका पोलिस निरीक्षक , म्हणून देविदास दुमणे तर घारगावला संतोष खेडकर, आश्वीला संतोष भंडारे नवे पोलिस निरीक्षक
संगमनेर / नगर- लोकवेध live न्यूज 
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधील प्रभारी राज संपुष्टात आणत जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. नव्याने नियुक्ती मिळाल्याने आता अधिकाऱ्यांना प्रत्येक पोलिस ठाण्यात कामातून गुन्हेगारी संपुष्टात आणावी लागणार आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मंगळवारी झालेल्याh
बैठकीनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या दिल्या आहेत.
अनेक वादग्रस्त आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवे पोलीस अधिकारी काम करणार आहेत. जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांना नियुक्त देण्यात आल्या आहे. मध्यावधी, प्रशासकीय, विनंती आणि नव्याने नेमणुका करण्यासंदर्भातील बदल्यांचा यात समावेश आहे. अधीक्षक पोलीस दलात
फेरबदल कधी करणार? याची उत्सुकता होती. प्रदेशतीर पुति दि. ०२ मार्च २०२३
संगमनेर पोलिस स्टेशनचे भगवान मधुरे नवे पोलिस निरीक्षक कसरी पॉलिन निक
अखेरीस मंगळवारी रात्री त्यांनी ही उत्सुकता संपुष्टात आणली. यामध्ये संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भगवान हरीभाऊ मथुरे हे नवे पोलिस निरीक्षक असतील तर संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला देविदास दुमणे आश्वी पोलिस स्टेशनला संतोष भंडारे तर घारगाव पोलिस स्टेशनला संतोष खेडकर नवे पोलिस निरीक्षक असतील तर संगमनेर कार्यरत असलेले प्रभारी पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक राजेंद्र बापूराव भोसले (जिल्हा विशेष शाखा अहमदनगर अतिरिक्त कार्यभार बीडीडएस आणि द.वि.प. अहमदनगर) येथे बदली करण्यात आली. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून राजेंद्र दशरथ पवार यांनी संगमनेर पोलिस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली.
तर अकोले पोलिस स्टेशन येथे सुभाष दादा भोये नवे पोलिस निरीक्षक असतील तर राजूर पोलिस ठाणे येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक
म्हणून गणेश इंगळे येथे नियमित राहणार आहेत. जिल्ह्यातील बदल्या झालेले पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोणाला कोठे मिळाली नियुक्ती वाचा
सविस्तर यादी 
(कंसात नियुक्तीचे ठिकाण)
पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे (संगमनेर शहर पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक देविदास किसन कुमणे (संगमनेर तालुका पोलीस ठाणे ) पोलीस निरीक्षक संतोष बापूराव खेडकर (घारगाव पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारे (आश्वी पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव (कोतवाली पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक मधुकर थोंडीबा साळवे (तोफखाना पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी (सुपा पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक संभाजी अभिमन्यू गायकवाड (पारनेर पोलीस ठाणे ) पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भगवानराव भोसले (श्रीगोंदा पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक विजय मारुती करे (कर्जत पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक महेश विष्णू पाटील (जामखेड पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक संजय राजाभाऊ ठेंगे (बेलवंडी पोलीस ठाणे) पोलीस
निरीक्षक संतोष रामचंद्र मुटकुळे (पाथर्डी पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे (नेवासा पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गोविंद गवळी (श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे नियमित) पोलीस निरीक्षक दशरथ निंबा चौधरी (श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक मेघश्याम दादा डांगे (राहुरी पोलीस ठाणे नियमित) पोलीस निरीक्षक नंदकुमार विष्णू दुधाळ (शिर्डी पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक गुलाबराव राजाराम पाटील (वाहतूक शाखा शिर्डी) पोलीस निरीक्षक रामराव त्र्यंबक ढिकले (कोपरगाव शहर पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले (कोपरगाव तालुका पोलीस ठाणे) पोलीस
निरीक्षक सुभाष दादा भोये (अकोले पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मणराव पेंदाम (शहर वाहतूक शाखा अहमदनगर) पोलीस निरीक्षक चंद्रकांत कृष्णा निरावडे (जिल्हा वाहतूक शाखा अहमदनगर) पोलीस निरीक्षक दिनेश विठ्ठलराव आहेर (सायबर पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक मच्छिंद्र रामचंद्र खाडे (मानव संसाधन अहमदनगर) पोलीस निरीक्षक सुहास भाऊराव चव्हाण (आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर) पोलीस निरीक्षक अरुण राधाकिसन आव्हाड (आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर) पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप (वाचक पोलीस अधीक्षक अहमदनगर) पोलीस निरीक्षक संपत सखाराम शिंदे (जिल्हा विशेष शाखा अहमदनगर) पोलीस निरीक्षक राजेंद्र बापूराव भोसले (जिल्हा विशेष शाखा अहमदनगर अतिरिक्त कार्यभार बीडीडएस आणि द.वि.प.अहमदनगर) पोलीस निरीक्षक राजेंद्र जगन्नाथ इंगळे (साई मंदिर सुरक्षा तसेच अतिरिक्त कार्यभार बीडीडएस शिर्डी) पोलीस निरीक्षक नितीन कुमार निळकंठ गोकावे (टी.एम.सी.अहमदनगर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!