रयत शैक्षणिक संकुल सात्रळच्या विद्यार्थ्यांची राज्य क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
निमगाव जाळी / लोकवेध live न्युज / अशोक गोसावी
श्रीरामपूर येथे झालेल्या युथ गेम्स स्टेट चॅम्पियन २०२३ च्या कबड्डी खेळात नगरपालिका स्टेडियम श्रीरामपूर स्टेडियमवर रयत शैक्षणिक संकुल ज्युनियर विभाग सात्रळच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा इयत्ता ११ वी सायन्स चा विद्यार्थी चि.कडू सार्थक संजय व चि.कानडे शंकर संजय ह्यांनी १७ वर्षाच्या वयोगटात कबड्डी या खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करत *सुवर्ण पदक* पटकावले
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा.पी.पी.सुर्यंवंशी सर,प्रा.विलास दिघे,जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर,केशव मुसमाडे, युनुस पठाण,सचि्दानंद झावरे,प्रा.पंकज दिघे,भारत कोहकडे,संजय दिघे,प्रकाश कुलथे, विलास गभाले,ज्ञानदेव लेंडे, वैभव वसावे सतिश नालकर, शिवदास सातपुते, देविदास थोरात, जालिंदर बनगये, प्रमिला पंडोरे, संगिता सांगळे, सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी प्रांजली फरकाडे,प्रा.अर्चना बनसोडे,पल्लवी गावडे,प्रविणाताई दिघे कावेरी वदक, प्रा.सतिश कदम,प्रा.आण्णासाहेब गोर्डे,प्रा.किशोर दातीर प्रा.विश्वास घुगे, सुदर्शन गिते, रत्नाकर सोनवणे आदिंचे मार्गदर्शन लाभले.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजी तापकीर, ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड,के.के.बोरा, शांतीभाऊ गांधी, युवानेते किरण कडू, पंकज कडू , विक्रांत कडू,गणेश कडू, प्राचार्य आर.बी.बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात,भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.
