वरवंडी येथील सप्ताहात तीस महिला बचत गटाच्या महिला महाप्रसाद वाढण्यासाठी सरसावल्या 

आश्वी : लोकवेध live न्यूज


संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र वरवंडी या पुण्यभूमीत सुरू झाला असून वरवंडी व परिसरातून हजारो भक्त भक्तीमय वातावरणातून दर्शन , किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात हरिनाम सप्ताहाचा मुख्य गाभारा म्हणजे महाप्रसाद वाटपाकरिता महीला बचत गटाच्या महीला एकवटल्याने दररोजचा होणारा आमटी – भाकर – भात प्रसादाचे वाटप सुनियोजीत व सुंदरमय होताना दिसत आहे .

ह भ प महंत मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीत माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज सप्ताहाची सुरुवात झाली .श्रीक्षेत्र वरवंडी या ठिकाणी या सप्ताहाचे 15 वे वर्ष आहे. सप्ताहासाठी भोसले परिवाराने जागा उपलब्ध करून दिली या ठिकाणी जवळपास १५ एकर जागेत या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन केले आहे . यासाठी २५० बाय १५० असा कीर्तन भव्य मंडप उभारण्यात आला आहे भोजनासाठी १०० बाय १०० असा मंडप उभारण्यात आला भजन मंडप, महाराजांसाठी कुटिया तसेच, साधूंसंत विश्रांती मंडप, यज्ञ मंडप, घटस्थापना मंडप , प्रहारेकरी मंडप आहे .

सप्ताहा यशस्वी करण्याकरिता संपूर्ण गावांतील गागरे , वर्पे , भोसले , बस्ते , दिघे , मोघे , केदारी , पाटोळे , काळे , देशवंत , निर्मळ , मुसमाडे , कराड , ढमाले , चौधरी , मांढरे , बकुळे , खवळे , केदार , कुलथे , नेहे आदी ग्रामस्थ रात्रंदिवस परिश्रम घेताना दिसत आहे .

या सप्ताहासह रामगिरी महाराजासह अनेक मान्यवर भेटी देत आहे . या सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा , सकाळी ज्ञानेश्वरी, पारायण दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रोज रात्री सात ते नऊ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनाची सेवा संप्रन्न होत असल्याने सकाळ पासून ते रात्री उशीरा पर्यत हजारो भक्त सप्ताह स्थळी येवून दर्शनाचा व लापसी – भात आमटी , भाकरी आमटी आदी प्रसादाचा लाभ घेताना दिसत आहे

दिवसेंदिवस या सप्ताह भाविकांची गर्दी होत वाढताना दिसत आहे तर सप्ताहात महीला – पुरुषासह हजारो स्वयंसेवक दिसत आहे या स्वयंसेवकांद्वारे सप्ताहात अन्नदानाच्या ठिकाणी वरवंडी , चौधरवाडी , कुंभारवाडी यासह परिसरातील भाविक, हायस्कूल ,शाळा , तरुण-तरुणी , कार्यकर्ते तसेच बचत गटाच्या महिला आदी सेवा देताना दिसत आहे .

सप्ताहामध्ये भाविक हा दिवसभर येत असल्याने सप्ताहाचा मुख्य गाभारा म्हणजे प्रसाद (अन्नदान ) होय याकरिता गावांतील साई महीला , मळगंगा , स्वामी समर्थ , माऊली , स्वरा , ग्राम उन्नती , जय मल्हार , भिमशक्ती , रामेश्वर , सिंद्धी , जयभीम , खुशिया , आरोही , पंचशिल , संतोषी माता , दुर्गा माता , रमाई , स्वराज्य , माणिकगिरी , जगदंबा , गोरोबा काका , सावित्रीबाई , श्रीसागर , एकता , सखी , सहेली , धम्मचक्र , प्रेरणा आदी 30 महीला बचत गटासह शालेय विदयार्थी ग्रामसंघ अध्यक्षा सौ छाया वर्पे , सी आर पी सौ कविता भोसले , कोष अध्यक्षा सौ ज्योती काळे , बचत गट अध्यक्षा सौ सपना केदारी यांच्या नेतृत्वाखाली 300 महीला एकवटल्याने प्रसाद (अन्नदान ) वाटप करण्याचे चोख जबाबदारी पार पाडली जात असल्यानेचं या नियोजनाचे परिसरातून कौतुक होत आहे .

 महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी खाली व्हिडिओला क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!