अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नवनाथ वावरे यांचा अभिष्टचिंतन निमित्ताने संघर्ष प्रवास
लोकवेध live न्यूज स्पेशल
आपल्या दैनंदिन जीवनात रोजीरोटीसाठी मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, सामाजिक बांधिलकी जपत गरजुना गरजेनुसार विविध माध्यमातून मदत करणे हाच माणुसकी धर्म अंगिकारलेला नवनाथ वावरे अर्थात नाथाभाऊ.
जेमतेम शिक्षण घेतल्यानंतर एका खाजगी औद्योगिक वसाहतीत रोजंदारी पद्धतीने संगमनेर तालुक्यात एक नौकरी मिळविली, नोकरी करत असताना तात्कालिन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॕ. सहाने मास्तर यांच्या संपर्कात आले, कम्युनिस्ट पक्ष व त्यांचे कार्यकर्ते नेहमी शेतकरी व कामगार यांच्या विविध मागण्या, विविध समस्या यावर विविध आंदोलने मोर्चे काढले जायची त्यातुन संबंधित प्राधिकरणाला मागण्या, समस्या मान्य करण्यासाठी योग्य ते पर्याय सुचवुन, योग्य ते निर्णय पटवुन देत शेतकरी व कामगारांच्या पदरात नेहमीच समाधान मिळवून देत असत. हे सर्व नाथाभाऊ सहाने मास्तर यांच्या बरोबर राहुन पाहत असे, त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असे, परंतु कालांतराने कम्युनिस्ट पक्षाचे नेते सहाने मास्तर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आणि संगमनेरात कम्युनिस्ट पक्ष स्थिरावला असेच चित्र तयार झाले.
नाथाभाऊ इथेच न थांबता आपली नोकरी करत, फावल्या वेळात पत्रकारिता करु लागले, कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेशी अनेक दिवस संलग्न राहिले परंतु डावा विचार कधीच त्यांनी अंगिकारला नाही, फक्त शेतकरी व कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्या नेता सहाने मास्तर यांच्या संपर्कात राहिले आणि समाजकारणाचे धडे आत्मसात केले.
सण २०१४ साली भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे यांच्या संपर्कात आले, विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काशिनाथ पावसे यांच्या माध्यमातून मोठी मदत झाली, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आरोग्य शिबिरांचे आयोजन, खासदार निधीतुन विविध विकास कामे करण्याची संधी मिळाली आणि याच संधींने नाथाभाऊ ना उत्तुंग भरारी घेण्यासाठी गरुड झेप दिली.
भारतीय जनता पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष ॲड श्रीराम गणपुले यांनी संकटात सह्याद्रीच्या पहाडासारखी खंबीर साथ दिली त्यामुळे राजकीय सामाजिक कार्य करण्यासाठी नवचैतन्य मिळाले. भाजप तालुकाध्यक्ष डॉ अशोक इथापे, संगमनेर तालुक्याचे युवा नेतृत्व विक्रमसिंह दादा खताळ पाटील, भाजयुमो उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष ॲड श्रीराज डेरे यांचेही अनमोल मार्गदर्शन व भरीव सहकार्य लाभत आहे, त्यामुळे नाथाभाऊ नी “थकनार नाही, वाकणार नाही,उतनार नाही,मातनार नाही,घेतला वसा टाकणार नाही” या लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांचा प्रभाव अंगात तग धरून आहे, विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रस्तावित राजकारणी लोकांची जहागीरदारीला न जुमानता आपले ध्येय धोरणे उराशी बाळगून संघर्षाचा लढा देण्याचे बळ मिळवले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या केडर कॕम्प मध्ये तयार झालेले सामाजिक कार्यकर्ते आहेत.
डिग्रस गावांसह पंचक्रोशीत नाथाभाऊ चें एक सामाजिक वलय निर्माण झाले, सामाजिक कार्य करताना अनेकांच्या नेतृत्व हितसंबंधांना बाधा येणार सर्वसामान्य युवक पुढे जातोय अशी सल मनात ठेवुन अनेकांनी मुळाशी घाव घालून कायमस्वरूपी खच्चीकरण करण्याचे कृत्य केले, चांगले कार्य करुनही दुष्मनीच वाट्याला आली पंरतु थांबेल तो नाथाभाऊ कसला, कम्युनिस्ट पक्ष डावा विचार ते भाजप पक्ष उजवा विचार दोन्ही विचारधारेतला “राजहंस” ‘दुध का दुध आणि पाणी का पाणी’ करत आपले कार्य अविरतपणे चालुच ठेवले, उलट जेवढा विरोध झाला,जेवढी संकटे आली तेवढीच वेगाने गरुडझेप घेण्याची संधी नाथाभाऊ नी अद्यापही कायम कार्यरत ठेवली आहे.
नाथाभाऊ तुमच्या या जन्मदिनानिमित्त मी माझ्या लेखणीला सावरु शकत नाही कितीही लिहावे ते थोडेच, ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची… तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची…पर्वा बी कुनाची’ असं म्हणत, सध्याच्या कठीण प्रसंगाशी जिद्दीनं लढा देणाऱ्या संघर्षात वाढु पाहणारे नाथाभाऊ ना सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात राजहंसाप्रमाणे कार्य करावे व गरुडझेप घ्यावी याचं शुभ शुभेच्छा आणि सदिच्छा…!
शब्दांकन
-कोंडाजी भाऊसाहेब कडनर
प्रदेशाध्यक्ष- भाजप भटके विमुक्त आघाडी सोशल मिडिया सेल महाराष्ट्र
संपर्क- ९६७३१६८२८१
