पिंपरणेत जगनाडे महाराज पुण्यतीथी उत्साहात संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने पिंपरणे गावातील तेली बांधव व संताजी तरूण मंडळाच्या सहयोगातून आज मंगळवार दि ९ रोजी समस्थ तेली समाजाचे प्रतिक तेल घाण्याचे पुजन करून व संताजी महाराजांची आरती करून मिरवणूकीस सुरवात करण्यात आली संताजी महाराजांच्या प्रतिमेची रथामध्ये गावातून शोभायात्रा काढण्यात आली .संताजी महाराजांच्या अभंगवाणी व संताजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण गाव दुमदुमले होते. गावात विविध संस्थांच्या वतीने संताजी महाराजांच्या प्रतिमेचे करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थानचे पदाधिकारी व संघटनांचे पदाधिका-यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. गावातील संताजी नगर येथून संताजी महाराज सवाद्य मिरवणूक व शोभायात्रेला सुरु वात झाली. संताजी महाराजांचा जयजयकार हरिनामाचा गजर करत शोभायात्रा उत्साहात पुढे जात होती .गावात ठिक ठिकाणी महिलानी सडा रांगोळी टाकून प्रतिमेचे पुजन केले तसेच विविध संस्था व मान्यवरांनी ठिकठिकानी संताजींच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात केले. जगतगुरु तुकाराम महाराज व श्री संताजी महाराज यांच्या अभंगांचे गीताच्या चालिवर अनेक भाविक भक्ती रसात चिंब झालेले संताजी सेवक व महिला नाचत बागडत फुगडी खेळत वाटचाल करीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिराच्या प्रारगंणात करण्यात आले होते येथे संताजी महाराजांच्याजीवनावर हभप अविनाश महाराज शिंदे यांचे प्रवचन होऊन महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी स्थानिक पदाधिका-री सहभागी झाले होते. संताजी महाराजांनी दिलेल्या संदेशावर वाटचाल करुण तेली समाजबांधवानी विकासाच्या प्रवाहात आपला ठसा उमटवा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी संताजी महाराजाना अभिवादन करुन दर्शन घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्थ तिळवण तेली समाज संताजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
