माका येथील मंकावती देवी यात्रा २५ व २६ रोजी उत्सव पुष्प पौर्णिमेला.

नेवासे (माका ) / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे

नेवासे तालुक्यातील माका येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत तसेच परिसरातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत म्हणुन ओळखले जाणारयां मंकावती देवी मातेच्या यात्रा उत्सवा चे, सालाबादप्रमाणे मराठी महीन्याच्या पुष्प पौर्णिमेला ठरल्या तिथीप्रमाणे, दि. 25 व 26 जानेवारीला ग्रामस्थ व मंकावती माता देवी ट्रष्ट कमीटीच्या वतीने आयोजन केले आहे.

या माका गावाचे नाव देवी मंकावतीच्या नावावरुनच

पडले असुन, प्रभुरामचंद्रांनी याचठिकाणी राक्षस अहीराव

व महीरावाचा वध केल्याची मोठी आख्यायिका आहे.यामु

ळे यादेवीच्या यात्रा उत्सवाची परंपरा फार जुनी वर्षेनुवर्षे

पासुन चालू आहे. ग्रामस्थ व कमीटीच्या वतीने सातत्याने

यात्रा तसे च नवरात्र उत्सवानिमित्त उत्सवकाळात विविध

धार्मिक कार्यक्रमासह मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे मोठ्या

प्रमाणात आयोजन केले जाते.

याप्रसंगी पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता कावड पाणी मिरवणूक व रात्री 8 वाजता छबीना, शोभेची दारु व त्यानंतर 9:30ला लोकनाट्य तमाशाकार्यक्रम तसेच दुस रयां दिवशी सकाळी 8 ते 10 वाजता जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून आलेल्या नामवंत कलावंता हजेरी कार्य क्रम व दुपारी 3 ते 6 वेळेत मल्लांच्या कुस्तीचा जंगी हगा मा होणार असल्यामुळे यात्राउत्सवाचा सर्व भावीक भक्तां नी लाभ घेण्याबाबतचे आवाहन ग्रामस्थ व मंकावतीमाता देवी ट्रष्ट कमीटीच्या वतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!