भाजपा चा भूलभूलैयांचा प्रकार जनतेच्या लक्ष्यात आला – कॉग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी तथा प्रवक्ता डॉ राजू वाघमारे
हायकमांडने संधी दिल्यास शिर्डीतून निवडणुक लढू
संगमनेर / लोकवेध live न्यूज
सध्या केंद्रात व राज्यात महायुतीकडून जनतेला विविध प्रकारे आमिष दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असले तरी जनतेच्या आता यांचा भूलभूलैयांचा प्रकार लक्ष्यात आला असून येणार्या लोकसभेत महाविकास आघाडीला शिर्डी , नगरसह ४० पेक्षा जास्त जागा निश्चित मिळणार असून राज्यात शिर्डीसह २२ ते २३ जागा कॉग्रेस पक्ष लढविणार तर शिर्डी लोकसभातर्गत कॉग्रेस पक्षाचे मोठे संघटन असल्याने या जागेकरिता दावा करत पक्ष आग्रही रहाणार तर हायकमांडने संधी दिल्यास शिर्डीतून निवडणुक लढू असे सुतावाचं कॉग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी तथा प्रवक्ता डॉ राजू वाघमारे यांनी दिला .
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बु॥ येथे खाजगी कार्यक्रम व भेटी प्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ राजू वाघमारे बोलत होते . याप्रसंगी आश्वी बु ॥ चे लोकनियुक्त संरपच नामदेव शिंदे , रिपाई ( गवई ) किशोर वाघमारे , ग्रा प सदस्य बबनराव शिंदे , अमोल राखपसरे आदीसह गामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एक ना अनेक प्रश्नाला उत्तर देताना डॉ वाघमारे पुढे म्हणाले की , शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती करिता राखीव असून या मतदार संघातून रामदास आठवले यांच्यासह अनेक निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहे २००९ पुर्वी या मतदार संघावर कॉग्रेस पक्षाचे प्रभूत्व राहिले आहे . काही कारणास्तव शिवसेनेचे उमेदवार निवडून गेले निवडून गेलेले दोन्ही उमेदवारांनी पक्षाशी विश्वासघात केला त्यामुळे जनतेमध्ये त्यांचा विश्वासहर्ता राहिला नाही . या मतदार संघात कॉग्रेस पक्षाचे संध्या दोन आमदार आहेत त्याशिवाय इतर तालुक्यात पक्षाचे मोठ्या प्रमाणात संघटन असल्याने हा मतदार संघ कॉग्रेस पक्षालाचं मिळावा म्हणून आम्ही दावा केला आहे . त्यानुसार कॉग्रेस पक्षाची चाचपणी सुद्धा झाली आहे तर पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ .बाळासाहेब थोरात हे या मतदार संघाचे समन्वक असून त्याच्या नेतृत्वाखालीचं शिर्डी लोकसभेच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे . तर पत्रकांराच्या ‘ तुम्ही निवडणुक लढविणार का ? प्रश्नाला उत्तर देताना डॉ वाघमारे म्हणाले की , पक्ष श्रेष्ठी व आ बाळासाहेब थोरात यांनी काम करण्याचा आदेश दिल्यास आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक राहू तसा मी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील रहिवाशी असून या मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्राबल्य आहे . त्यांना मानणारा युवक , शेतकरी , व्यापारी वर्ग मोठा
आहे संध्या काँग्रेस पक्षाला भविष्य चांगले असून संध्याच्या खासदाराला लोक वैतागलेली आहे दोन वेळेस झालेल्या खासदारांना लोक ओळखत नाही ही मोठी शोकांतिका आहे . बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा व मतदारसंघाचा खासदार काँग्रेसचा व्हावा अशी मतदाराची व लोकांची इच्छा आहे सध्याच्या शिंदे सरकारला लोक कंटाळले . केंद्र व राज्य सरकारचे धोरण कुचकामी असल्याने महागाई , बेरोजगारी वाढली आहे . हे मोदी – शिंदे सरकार सर्व सामान्य , आदीवाशी , मागसवर्गिय , शेतकऱ्यांचे नसून केवळ आदानी – अंबानीचे आहे . विदयार्थ्याचे शिष्यवृत्ती बंद करणे , शेतीमालाला भाव न देणे , केवळ भूल – भूलैयांचा प्रकार करुन लोकांना मोठ – मोठी स्वप्ने दाखवून ‘ हाय प्रोफाइल ‘ योजनेचा बडगा लावणे उज्वला गॅसची योजना आणून १० कोटी गॅस वाटले मात्र सुरुवातीला भरलेल्या गॅस टाक्या रिकाम्या होवून धूळ खात पडल्या त्या गरिबांनी हजार अकराश्यात कश्या गॅस टाक्या भरव्यात . पेट्रोल दरवाढ , छोट्या – मोठ्या वस्तूसह शेतकर्यांच्या शेतीमाला जीएसटी या सरकारला शेतकऱ्याचे काही देणे घेणे राहिले नाही .
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा देशांमधील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे साई बाबा मंदिर असून ही विविध समस्याच्या विळख्यात म्हणून आता परिचित झाले आहे . लोकप्रतिनिधीला गेल्या दहा वर्षांत नगर – मनमाड महामार्ग बनविता आला नाही ही मोठी खेदाची बाब आहे रस्ता चांगला नसल्याने शिर्डीसह इतर परिसरात धूळीचे साम्राज्य व वाहतुकीची मोठी कोंडी दिसून येत आहे अनेक सुख – सुविधा पासून शिर्डी शहर वंचित असल्याने येणाऱ्या भक्त हा अतिशय नाराज दिसत आहे . तसेच शिर्डी व परिसरात एम आय डी सी झाल्यास मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल .आ बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निळवंडे व उजव्या , डाव्या कालव्याचे कामे जवळ जवळ मार्गी लागले असून शिर्डी व परिसरा पर्यत पाणी पोहचले आहे आता उजव्या कालव्याला सुद्धा लवकरचं पाणी येईल त्यामुळे बेरोजगारी कमी होवून परिसर सुजला – सुफलाम् होईल
राम हे हिंदू धर्माचे प्रतिक असून ते सर्वाचे श्रद्धास्थान आहे मात्र आयोध्याचा होणारा कार्यक्रम हा राजकिय प्रेरीत असून राम मंदिरांचे काही काम अपुरे असताना उट्रघाटनाचा अट्टाहास का ? हे समजत नाही हे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धोरण होत असून आता श्रीरामच्या माध्यमातून राजकारण होत असल्यानेचं आदरयुक्त मनाने या होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस पक्ष सामिल होणार नाही . त्यातून शंकाराचार्य यांच्यासह काही महंतांनी ही न जाण्याचा निर्णय घेतल्याने केद्रीय मंत्री नारायण राणे या जेष्ठ नेत्यांनी या शंकाराचार्य योगदान काय असा प्रश्न उपस्थित केल्याने आम्ही त्यांच्या या विचाराचा निषेध करत आहोत . तर इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेण्यात कॉग्रेस पक्षाकडून कुठलीचं अडचण नसून त्यांना संपुर्ण सहयोग रहाणार असल्याचे डॉ वाघमारे यांनी शेवटी सागितले .
