श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठाण सोहळ्या निमित्ताने सोमवारी विविध भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर / लोकवेध Live न्यूज (भाऊसाहेब फड मुख्य विशेष प्रतिनिधी)

श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा २२/०१/२०२४ सोमवारी अयोध्या येथे अनेक भव्य दिव्य कार्यक्रम होणार
तसेच संपूर्ण भारतात सर्वत्र प्रत्येक शहर व ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम होणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे सोमवारी अनेक भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
त्यामध्ये संपुर्ण गावात गुडी उभारुन रांगोळी काढण्यात येईल शेडगावातील सर्व छोटी मोठी मंदिरावरती आकर्षक लायटिंग टाकुन लक्ष्मीमाता मंदिरासमोर पताका लावण्यात येतील व शेडगावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल
संध्याकाळी ५वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य दिव्य व आकर्षक मिरवणुक काढण्यात येईल
संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत लक्ष्मी माता मंदीरासमोर हभप सुनिल महाराज पवार यांचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
या आनंद उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या दुकान व घरासमोर रांगोळी काढावी व भगवा ध्व्ज घरावरती प्रत्येकाने लावुन गुडी उभारावी व प्रत्येकाने सोमवारी संध्याकाळी कमीत ५पणती जास्तीत जास्त कितीही पणती लावावी
शेडगाव येथील सर्व तरुण मित्र मंडळ व सर्व बचतगट महिला सर्व ग्रामस्थांनी व प्रंचकोषीतील भाविक भक्तांनी या विविध कार्यक्रमांचा सहभागी होऊन आस्वाद घेवा असे आवाहन आयोजक शेडगाव सर्व तरुण मित्र व सर्व ग्रामस्धानी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!