हसनापूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लु मृत्यू , सावगिरीचा आवाहन
आश्वी | लोकवेध live न्यूज
राहाता तालुक्यातील हसनापूर शिवारातील लोणी – आश्वी रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचे पिल्लु मृत्यु झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन होताना दिसत आहे .
मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि ३० जानेवारी २०२४ रोजी रात्री ८ ते ८ :३० वाजल्याच्या सुमारास हसनापूर शिवारातील लोणी – आश्वी रस्त्यावर आश्वी दिशेने साधारणपणे दोन महीन्याचे असणारे बिबट्याचे पिल्लू अज्ञात वाहनाच्या धडकेत रक्ताच्या थारोळात मृत्यु असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने हसनापूर शिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले .
बिबट्याच्या पिल्लूचे मृत्यु झाल्याने शेजारीचं बिबट्या मादी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आजू – बाजूच्या रहीवाश्यांनी घरा बाहेर पडून नये तर लोणी – आश्वी रस्त्यावरील प्रवाशांनी सावधपणे प्रवास करावा असे आवाहन होत आहे .
