एक दीड वर्षिय बिबट्या अथक परिश्रमातून अखेर जेलबंद
मादी व बछडा शिल्लक राहिल्याने परिसर दहशत निर्माण झाली असून पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी – शिबलापूर शिवावर धुमाकूल घालणार्या बिबट्यांपैकी एक दीड वर्षिय बिबट्या १५ दिवसाच्या अथक परिश्रमातून अखेर जेलबंद मात्र उदयाप एक मादी एक बछाडा असण्याची शक्यता वर्तविली जात असल्यानेचं परिसरात दहशती वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी होत आहे .
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी , शिबलापूर , शेडगांव , आश्वी , दाढ , पिंप्री लौकी अजमपूर , खळी या गावांतील शिवारात मोठ्या संख्येने बिबट्याची वाढ झाल्याचे दिसून येत असून मोठी दहशत पसरली आहे . महीन्यापुर्वी लोणी , सादतपूर येथे लहान मुलांचे बिबट्यांनी हल्ला करुन बळी घेतले तर हसनापूर शिवारात एक महीन्यांचा बछड्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला तर लोणी , सादतपूर , शिबलापूर आदी ठिकाणी बिबट्या जेलबंद झाले यावरुन या २८ गांवे परिसरात बिबट्याचा मोठ्या संख्येने वावर झाल्याचे दिसून येत आहे .
मंगळवार पहाटे शिबलापूर – पानोडी शिवारातील नागरे वस्तीवर बिबट्यानी मोठा धुमाकुल होत असल्याचे शिबलापूर संरपच प्रमोद बोंद्रे , प्रविण खेडकर यांच्यासह ग्रामस्थांनी वनाधिकारी सुहास उपासनी , हरिचंद्र जोजार यांना सांगितले त्यानुसार नागरे वस्तीवरच्या ऊसाच्या कटाजवळ पिंजरा लावण्यात आला . मात्र ४ ते ५ दिवस होवून ही बिबट्या काही पिंजऱ्यात येत नसल्याचे बसून नागरे वस्तीच्याचं दुसर्या बाजूला पिंजरा लावण्यात आला तेथे पिंजऱ्यात बिबट्याच्या शिकारी करिता कुत्रा ठेवण्यात आल्याने दुसऱ्याचं दिवशी दीड वर्षिय बिबट्या जेरबंद झाले मात्र बिबट्या पिंजर्यात अडकताचं मादीनी मोठी डरकाळी फोडत ऊसात निघून गेल्याचे रहिवाशी सांगत असले तरी तेथे ऊस तोडण्याचे काम चालू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
नागरे वस्तीवरील रहिवाशांनी लहान – लहान मुलांना एकटे सोडू नका व रात्रीच्या वेळेत घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन वनाधिकारी सुहास उपासनी व हरिचंद्र जोजार यांनी केले आहे .
