दाढ खुर्द मध्ये तीन पिंजरे लावूनही ३६ तासात बिबट्याचा एकाचं ठिकाणी दुसऱ्यांदा हल्ला ! परिसर बिबट्याची दहशत
संगमनेर । लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द व परिसरातील जोशी वस्ती जवळ मागील काही दिवसांपासून बिबट्याकडून माणसावर हल्ल्याच्या घडत असून शुक्रवारी सकाळी वृद्धावर हल्ला होवून पुन्हा ३६ तासात त्याच ठिकाणी ५ व्यक्तीवर जीवघेणे हल्ला झाला . तीन पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने आता मात्र दाढ खुर्द गांव बिबट्याच्या विळख्यात सापडल्याचे चिन्ह दिसत असून वनविभागाने या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून दाढ खुर्द शिवारात बिबट्याने धुडगूस घालत मोठी दहशत निर्माण केली असून एका महीन्यात आठ ते नऊ व्यक्तीवर या बिबट्याने हल्ला केला आहे. शुक्रवारची घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याच ठिकाणाहून दुचाकीवरून प्रवास करताना पाच जणावर बिबट्याने पुन्हा हल्ला करत जखमी केले. यामध्ये दाढ बुद्रुक येथील दिगंबर कारभारी थोरात व त्याचा मुलगा तसेच मारुती नांगरे व त्याची पत्नी, शिवाजी सोमनाथ गिते व त्याचे वडील सोमनाथ गिते याचा समावेश असून हे सर्वजण दुचाकीवरून चालले होते.
त्यामुळे आक्रमक झालेल्या दाढ खुर्द ग्रामस्थांनी आता या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी आक्रमक मागणी वनविभागाकडे होत असून सरपंच सतिश जोशी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने या जखमींवर दाढ बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली .
नाशिकवरून विशेष पथक येणार
याबाबत राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नाशिकवरुन विशेष पथक येणार आहे मात्र याबाबत विधीमंडळात महसूल मंत्री राधाकष्ण विखे यांनी बिबटे व हल्ल्याबाबत विषय मांडवावा
सतिश जोशी ( संरपच , दाढ खुर्द )
