ओझर बु ते श्री तिर्थक्षेत्र त्र्यंबकेश्र्वर दिंडीचे आयोजन व भाविक भक्तांसाठी त्र्यंबकेश्र्वर येथे मोफत चहा व खिचडी फराळाचे आयोजन
नाशिक / लोकवेध live न्यूज (भाऊसाहेब फड मुख्य विशेष प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रीसंत निवृत्ती महाराज यात्रेनिमित्त संपुर्ण महाराष्ट्रातुन लहान मोठ्या दिंड्या त्र्यंबकेश्र्वर येथे आलेल्या होत्या
तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ओझर बु ते श्री तिर्थश्रेत्र त्र्यंबकेश्रर दिंडी सोहळा आयोजन हभप दत्तात्रय महाराज नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते
एकादशी निमित्याने बह्मागिरी प्रदक्षिणा करणा-या भाविकांसाठी मोफत चहा व खिचडी फराळ चे नियोजन करण्यात आले होते सकाळी ४ते १० वाजेपर्यंत चहा व सकाळी ८ते १ वाजेपर्यंत खिचडी फराळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ओझर येथील महिला व उपस्थित भाविकांची चहा व फराळाचे वाटप करण्यात आले व ब्रह्म गिरी पर्वतास प्रदक्षिणा करणा-या अनेक भाविक भक्तांनी यांचा लाभ घेतला
यावेळी आयोजक हभप दत्तात्रय महाराज नागरे श्री आबासाहेब दुधाडे श्री दशरथ नागरे बाळासाहेब पवार महादेव हळनर भाऊसाहेब सानप गिरजु मेंगनर संजय म्हस्के धनराज हळनर विठोबा बाचकर भागवत खेमनर धोंडीबा सानप जितेंद्र सानप रेवजी खेमनर रंगनाथ बिडगर नंदा आमले
मुख्य विशेष प्रतिनिधी भाऊसाहेब फड यांच्या सह ओझर बु शेडगाव कुरणपुर येथील भजनी मंडळ व अनेक भाविक व महिला या दिंडी मध्ये उपस्थित होत्या व ओझर बु व पंचक्रोशीतुन अनेक भाविक भक्तांनी अन्नदान दिले आहे
