संगमनेर / लोकवेध live न्यूज
ग्रामीण भागातील गायकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी लायन्स क्लब संगमनेर मालपाणी ग्रुप तर्फे दरवर्षी वेगवेगळ्या गटांमध्ये ‘सफायर आयडॉल स्पर्धा’ आयोजित करत असते. यावर्षी स्पर्धा मालपाणी लॉन्स येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये अभिजात संगीत विद्यालयाचे चि. यश केदारी गट क्रमांक २ व चि. शिवम उमप गट क्रमांक ४ मध्ये प्रथम आले. नैसर्गिक गोड आवाज असलेला चि. यश व शिवम अभिजात संगीत, विद्यालय येथे संगीताचार्य विनोद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गायनाचे धडे गिरवत आहे.
गेली अनेक वर्ष अभिजीत संगीत विद्यालय संगमनेर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीताचे व गायनाचे धडे देऊन घडवत आहे. चि. शिवम, यश व अभिजात संगीत विद्यालयाचे उज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.