शालेय विद्यार्थ्यांना सायकलिंग विषयी प्रबोधन
नाशिक / लोकवेध live न्यूज
नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन,प्रथम संस्था नाशिक व मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय, पखाल रोड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन चे सदस्य सकाळी अनंत कान्हेरे मैदान येथे जमले. माजी अध्यक्ष प्रवीण कुमार खाबिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राईडला सुरुवात झाली. “सायकल चालवा ,पर्यावरण वाचवा, आरोग्य टिकवा ” हा संदेश देत द्वारका मार्गे पखाल रोड येथील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय येथे सायकलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले*.
*सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शेवाळे,उपमुख्याध्यापक मोहन माळी तसेच सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किर्ती वर्मा ,उपप्राचार्य जगदीश माळी,रोहिणी जगताप यांनी सायकलिस्टचा सन्मान केला.शाळेच्या पटांगणात पहिली ते चौथीचे 480 विद्यार्थी, तसेच जुनियर व सीनियर कॉलेजचे 35 विद्यार्थी व 20 शिक्षक उपस्थित होते.*
*नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ मनिषा रौंदळ यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधून सायकलिंग चे महत्व पटवून दिले. तसेच वेगवेगळ्या सायकल प्रकारांची माहिती दिली व सायकल कोणती व कशी निवडावी याबद्दल मार्गदर्शन केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल बघून मुले देखील आश्चर्यचकित झाले. अनेक प्रश्नांची निर्भीडपणे उत्तर देणाऱ्या तन्मय रवी कुवर या विद्यार्थ्यास नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर काळे आणि श्री शंकर गांगुर्डे यांनी एका गरजू मुलीसाठी सायकल भेट देण्याचे आश्वासन दिले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य जी. के . अहिरे सर यांनी सायकलचे वेगवेगळे फायदे याबद्दल एक छानशी कविता सादर केली. डॉ. संदीप भानोसे यांनी सुरक्षित वाहतुकीचे नियम याबद्दल माहिती दिली. नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे संचालक एस. पी. आहेर, प्रवीण कोकाटे यांनी सर्वांचे आभार मानले. या राईड चे आयोजन व नियोजन सौ वृषाली हिरे यांनी उत्तम केले*.
*श्री किशोर काळे*
*अध्यक्ष*
*नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन*
