मंदिरा सारख्या पवित्र स्थळातून धर्माचे रक्षण होईल:- आ. संग्राम जगताप
२० मार्चला होणार भूमी पूजन :- विश्वकर्मा प्रगक दिन उत्साहात संपन्न
————————
अ .नगर / लोकवेध live न्यूज
धर्माचा पगडा कायम राहण्यासाठी मंदिराची नितांत गरज आहे, परंतु धर्म रक्षणाचे काम
मंदिरा सारख्या पवित्र स्थळातून होईल असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. श्री कालिका माता मंदिर येथे विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज आयोजित श्री विराट विश्वकर्मा भगवान यांचा माघ शु. त्रयोदशी निमित्त प्रगट दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. समाजाशी संवाद साधतांना जगताप म्हणाले की, आज लोक विस्थापित झाले आहेत. तर दुसरीकडे जागेची वाणवा आहे. कष्टकरी शिल्पकार विश्वकर्मा समाजाला जागा उपलब्ध झाल्याने या समाजाला एक नवी दिशा मिळणार आहे. सर्व सामान्यांची इच्छा पूर्ण होणे ही भगवंताची इच्छा आहे. माणसाला धर्मा विषयी स्वाभिमान असावा. माणसासाठी धर्म आणि धर्मासाठी माणूस हे सूत्र आहे. पुरातन काळापासून धर्माचा पगडा हा मानव जातीवर आहे. धर्म रक्षणासाठी माणसाने पुढे आले पाहिजे. आपले संस्कार जतन करून धर्म जागवत तो वाढवला पाहिजे. हल्ली माणसे पांगल्या गेलीत त्यांना एकत्र आणण्यासाठी मंदिरा सारखे पवित्र स्थान नसल्याने मंदिराच्या निर्मितीतून लोकांचा सहभाग वाढणार आहे. यातूनच धर्म जागृती होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी समाजाचे अध्यक्ष सुनील नाळके, खजिनदार उमाकांत भोकरे, सचिव लक्ष्मीकांत भोकरे सह सदस्य समाज बांधव, भगिणी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
*भूमी पूजन सोहळाही होणार*
सावेडी येथे आठरे पाटील पब्लिक स्कूल जवळ विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाजाच्या श्री विश्वकर्मा मंदिराचे भूमी पूजन बुधवार 20 मार्च फाल्गुन शु. एकादशीला आमदार संग्राम भैय्या जगताप, श्रीक्षेत्र देवगडचे प. पू. महंत श्री भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी महाराष्टातून विविध ठिकाणाहून समाज बांधव आणि युवकांचे जत्थे उपस्थित राहणार आहेत.
*आमदार संग्राम जगताप यांचे योगदान*
— या मंदिराच्या महान कार्यासाठी आमदार संग्राम भैय्या जगताप , नगरसेवक संपतदादा बारस्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
