राष्ट्र संत स्वामी जनार्दन मौणगिरी महाराज यांचे दत्त पावन आश्रमात शिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न…
बाळासाहेब जगनर यांची दोन एकर जमीन दत्त पावन आश्रमास भूमिदान
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील येथिल दत्त पावन आश्रमात महाशिवरात्र मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.दत्त पावन आश्रमातील संपुर्ण परिसर स्वछ करुन तिथे अस्तित्वात असलेले दत्त महाराजांचे मंदीर पुर्ण स्वच्छ पाण्याने धुवून काढण्यात आले तसेच मंदीर व परिसर सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मंदीर परिसर लख्ख दिव्यांनी उजळून निघला होता ‘साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’याप्रमाणे संपुर्ण परिसरात एक उत्साहाचे,आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सकाळी तेथील दत महाराजांना दुग्धअभिषेक करुन पालखीचे पूजन करण्यात आले तसेच आम्लेश्वर मंदिरात देखील दुग्ध अभिषेक,पूजन करण्यात आले.राष्ट्र संत जनार्दन स्वामीमौणगिरी महाराज यांचे शिष्य जुना पंचनाम आखाडयातील राष्ट्रीय संत परिषदेचे अध्यक्ष स्वामी शिवगिरी महाराज यांचे शिष्य निलकंठेश्वर महाराज यांची आठ महिन्यापूर्वी अंभोरे येथिल राष्ट्रसंत स्वामी मौणगिरी महाराज दत्त पावन आश्रमाचे मठाधीपती म्हणून निवड झाली.आज प्रथमच निलकंठेश्वर महाराजांच्या उपस्थितीत महाशिवरात्र साजरी करण्यात आली यावेळी नीलकंठेश्वर महाराजांच्या वाणीतून उपस्थित भाविक,ग्रामस्थ,महिलांसाठी प्रवचन सेवा संपन्न झाली.आपल्या सुंदर रसाळ वानीतून प्रवचन सेवा करत असतांनी उस्थितांना उपदेश करतांनी पृथ्वी तलावांवर भारतीय संस्कृतीत देव,साधु-संतांना खुप मोलाचे स्थान आहे.आपली भुमी ही थोर साधु-संताची आहे.या भूमीत अनेक महान साधु-संत जन्माला आले त्यांचेच आदर्श विचारावर आज पर्यंत आपण सर्वजण चालत आहोत.’जिंदगी एक किरायेका घर है! एक ना एक दिन निकलना पडेगा,जब मौत तुमको आवाज दुंगी,घरसे बाहर निकलना पडेगा! हे प्रमाण देत जिवन एक भाड्याने दिलेले शरीर आहे ते खुप लाख-मोलाचे आहे.त्यास चांगले वळण,सवयी लावुन परमेश्वराने दिलेल्या या सुंदर देहाचे जतन करा.चांगल्या सवयी लावुन वाईट प्रवृत्तीचा आजच्या दिवशी संकल्प करुन त्या बंद करा.प्राचीन संस्कृतीपासुन एक इतिहास,पोथी पुराण,विविध धार्मिक ग्रंथात महादेवाचे महत्व संगितले आहे.ब्रम्ह,विष्णू,महेश हेच पृथ्वीचे निर्माता आहे.त्यात महादेवांचाही सहभाग खुप महत्वाचा आहे.पुरातन काळात वाईट कर्म,कृत्य करत असतांना न कळत हर -हर महादेव,ओम्ं नमो शिवाय या नामाचा जप केला गेला त्यांचे कडून पाप घडत असतांना न कळत हा जप केला गेल्यामुळे त्यांचे कडून पुण्य घडले परिणामी त्यांचेकडून आजच्या दिवसाचे एक व्रत पुर्ण झाले म्हणून त्यांचे पाप नाहीसे झाले.यालाच महा शिवरात्र म्हणतात.महादेवाचा महिमा पुरातन ग्रंथ,यातील दाखले देत सांगितला.
https://youtu.be/tHrLpmBYu84?si=XYDi2zaUdHQdHqk-
आज समाजा दिशाहीन होत असुन आपल्या मुळ स्न्स्कृतिपासुन दुर चाललाय त्यामुले समाज अधोगतीकडे चालला आहे.त्यासाठी व्यसन मुक्ती करा,चांगला आहर भक्षण करा,पुर्वीची चुकिच्या परंपंरा याचे आजच्या दिवशी दहन करा आणि आपण करत असलेली पशु-हत्या बंद करा,मुक्या प्राण्याचे जीवास जिवदान द्या असे आवाहन करत आपले गाव देखील खुप महान आहे.या गावाने देखील ह.भ.प.लक्ष्मण महाराज खेमनर जन्मभूमी (अंभोरे )तर कर्म भुमी इगतपुरी त्यांनीच संपुर्ण महाराष्ट्रात अखंड वारकरी शिक्षण संस्थेचा पाया घातला त्यावरच आज अनेक कीर्तनकार निर्माण झाले असुन समाज प्रबोधनाचे काम करत आहे.आपल्या गावास गगनगिरी महाराज,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज,नारायणगिरी महाराज यासारखे अनेक संताचा वारसा लाभलेला आहे त्याचा परिणाम आज कोणतेही मोठे अनिष्ठ संकट आपल्याकडे,गावावरआल्यास ते माघारी परतवून लावण्याची शक्ती आपल्यात या महान संताचे आशिर्वादामुळे झालेली आहे हे विसरुन चालणार नाही.जिवन जगत असतांना खऱ्याचा पुरस्कार करा आणी खोट्याचे दहन करुन चांगले जिवन निर्माण करा. कारण आज भाऊ भावाला लूटतोय,फसवतोय आणि श्रीमंत होण्याची त्याची चाललेली धड -पड ही क्षणिक आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीचे लोक अधोगतीकडे जात असुन त्यांचे मुला-बाळांना याचा त्रास होत आहे त्यांनी केलेल्या वाईट कर्माची शिक्षा यांना भोगावी लागत आहे म्हणून देवाचं,साधुचं ,गावचं ,आणि भावाचं कधीच खाऊ नका अथवा त्यांना लुटू नका,फसवु नका असे आवाहन करुन आई -वडिलांबरोबरच परमेश्वराची सेवा करा .दिवसातून किमान दोन तास परमेश्वराची सेवा ही श्रध्दा आणि आदरपूर्वक करा.साधु-संतांचा सन्मान करा!आज काही लोक धर्माचे आणि साधु-संताचे नावाखाली चुकिची महीती आणि दिशाभूल करुन आपणच किती महान आहे हे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करतात अशा ढोंगी-लबाड लोकांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करा की ज्यामुळे खरे साधु-संताना याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे.आपण भावनिक होवुन दान धर्म करु नका.दान धर्म करतांना ती व्यक्ती खरोखर त्या प्रवृत्तीची आहे काय याची शहनिशा करुनच दान धर्म करा अन्यथा दान-धर्म घेणा-यापेक्षा देणा-यास याची शिक्षा भोगावी लागेल.तरी आपण सर्वांनी संताचे-साधूंचे विचार आत्मसात करा.हेच आपणास जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला मार्ग दाखवितात त्याचा स्विकार करा कारण यात त्यांचा कोणताही स्वार्थ नाही.शेवटी दत्त महाराजांची आरती करुन प्रवचन सेवेचा समारोप करण्यात आला.प्रसंगी अंभोरे गावातील आणि पंचक्रोशीतील भाविक,ग्रामस्थ,प्रतीष्ठीत व्यक्ती,महिला,युवक,युवती मोठ्या संख्खने उपस्थित होते.गावातील ग्रामस्थ,युवक,व्यापारी,भाविकां नी फार मोलाचे आर्थीक,वस्तू,रुपाने देणगी देवून फराळ बनविण्यात आले.तसेच युवकांनी पाण्याचे जार आणी ताक देवून सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानण्यात आले.उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सरपंच सौ.सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव सोपानराव खेमनर, आश्रमास दोन एकर भूमिदान देणारे बाळासाहेब जगनर, श्री.हौशिराम वाघमोड़े,श्री.सुभाषराव हळनोर ,श्री.श्रावण जगनर,श्री.भाऊ जगनर,श्री.गोरख खेमनर,डॉ.श्री.सोमनाथ सोर,भाऊसाहेब जगनर,भागवत जगनर,श्री.चांगदेव वाकचौरे,अँड.शंकरराव खेमनर,डॉ.प्रा.आण्णासाहेब जगनर,श्री.रभाजी वाघमोड़े आदिंनी विशेष परिश्रम घेतले
