जलदुर्गांच्या प्रतिकृती व विविध किल्यांच्या छायाचित्रांचे संगमनेरात प्रदर्शन.

संगमनेर / लोकवेध live न्यूज

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाद्वारे सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या जलदुर्गांच्या प्रमाणबद्ध आणि अतिशय सुबक अशा प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी या प्रतिकृतींचे प्रदर्शन होत आहे. संगमनेरमधील नागरिकांसाठी या प्रतिकृतींचे प्रदर्शन *दिनांक 8 व 9 मार्च रोजी संगमनेर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले आहे.*

आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गिरीदुर्ग, जलदुर्ग व भूदुर्ग यांच्या साह्याने स्वराज्य निर्मिती केली. आपल्या राज्यातील किल्ले, त्यांचे महत्त्व, त्यांची बांधणी या किल्ले बांधणी मागील छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी लहान थोरांपर्यंत पोहोचवण्यासाठी महासंघाने किल्ले सिंधुदुर्ग व किल्ले विजयदुर्ग यांच्या *६ बाय ८ फूट आकाराच्या सुंदर व प्रमाणबद्ध अशा (राईट टू स्केल) प्रतिकृती* तयार केल्या आहेत. महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी होणाऱ्या त्या प्रतिकृतीचे प्रदर्शन पाहण्याची दुर्मिळ संधी संगमनेरमध्ये उपलब्ध होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समुद्री आरमार उभे करण्याची 360 वर्षांपूर्वीची दूरदृष्टी या प्रतिकृती बघताना अनुभवता येणार आहे.


यासोबतच ज्येष्ठ गिर्यारोहक मा. श्रीकांतजी कासट (अध्यक्ष- अहमदनगर जिल्हा गिर्यारोहण संघटना) यांनी गेल्या 40 वर्षातील दुर्ग भ्रमंतीतून घेतलेल्या निवडक गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन त्यानिमित्ताने आयोजित करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांद्वारे दैदीप्यमान इतिहास निर्माण केला ते प्रदर्शन पाहणे अतिशय प्रेरणादायी असून पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन यावे व शाळा महाविद्यालयांनी आपापल्या विद्यार्थ्यांना ते पाहण्यास प्रोत्साहित करावे अशी विनंती आपणास करण्यात येत आहे.संगमनेर महाविद्यालयामधील टुरिझम विभाग आणि अहमदनगर जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केलेले शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्व नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

प्रदर्शनाचे दिनांकबुधवार ८ व गुरुवार ९ मार्च

वेळ :- सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत

ठिकाणसाईबाबा सभागृह, संगमनेर महाविद्यालय,

अधिक माहितीसाठी संपर्क –
सौरभ म्हाळस, मो – 8830313849
प्रा.तिवारी सर, मो – 9405907397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!