संगमनेरच्या संवेदनशील भागात राहणार तिसऱ्या डोळ्याची करडी नजर.
सकल हिंदू समाजाने केलेल्या मागणीची घेतली नगरपालिकेने दखल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड व जोर्वे नाका परिसरात दोन गटात हाणा मारीच्या घटना घडल्या. मात्र या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्यामुळे अनेकांचे फावले गेले तसेच या भागातून मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत आहे त्यामुळे या अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी वरील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत नगर पालिका प्रशासनाने जोर्वे नाका, कोल्हे वाडी रोड व दिल्ली नाका या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे आता या भागात चालणाऱ्या विविध घडामोडींवर सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे त्यामुळे व्यवसायाला नक्कीच पाय बंद घालण्यास मदत होईल
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड वर आठ ते दहा दिवसांपूर्वी एकातरुणाने गाडीचा कट मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला त्याच्या दोन लहानमुलीं समक्ष जबर मारहाण करण्यातआलीहोती या हाणामाऱ्या सोडविण्यास गेलेल्याअन्य दोन तरुणांना ही शास्त्रांनी मारहाण केली होती .तसेच क्रिकेट खेळून जोर्वेगावाकडे जाणाऱ्या तरुणांना जोर्वे नाक्यावर आड वून मारहाण करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे हिंदू समाज बांधव चांग लाच आक्रमक झाला होता. या परिसरात सुरू असणारे गोवंश हत्यासारखे अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे तसेच सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि या भागात सुरू असणारे बेकायदेशीर अति क्रमणे काढण्यात यावीत या प्रमुख माग ण्यांसह इतर मागण्या सकल हिंदू समाजा च्या वतीने पोलीस प्रशासनाकडेकरण्यात आल्या होत्या. या मागण्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाहीतरजनअक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला होता मात्र पोलीस प्रशासनाने घेत पूर्ण करण्याचे आश्वासन सकल हिंदू समाज बांधवांना दिले होते .त्यामुळे जन आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला होता.
या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्यामुळे या भागातील लोकांच्याअवैध व्यवसायाकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष जात नाही. त्यामुळे या भागात लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने या माग णीची गंभीर दखल घेत शहरातील अति संवेदनशील असणाऱ्या जोर्वे नाका कोल्हे वाडी रोड आणि दिल्ली नाका या परिसरा मध्ये सीसीटी व्ही कॅमेरे बसविले आहे. या कॅमेऱ्यामुळे या भागातून होणारी बेकायदे शीर गोवंश हत्याला आळा बसण्यास मदत होईल तसेच या भागात घडणाऱ्या विविध घडामोडींवर सुद्धा या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे मात्र हे कॅमेरे या भागात व्यवस्थित राह तात की नाही यावर नगरपालिका प्रशास नाने लक्ष ठेवावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड जोर्वे नाका आणि दिल्ली नाका या परिस रात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती तातडीने संगमनेर नगरपालिकेच्या निधी तून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.मात्र आचारसंहिता संपल्यानंतर आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर शहरा तील अकोले रोड नगर रोड बीएड कॉलेज सर्कल या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे
श्री राहुल वाघ
मुख्याधिकारी संगमनेर नगरपालिका
