भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी अर्ध्यावर्ती डाव मोडिला अधुरी एक कहाणी!…स्वर्गीय जिजाबाई बाळासाहेब जगनर अनंतात विलीन !….

श्री.लहानु भिमाजी खेमनर एक सामाजिक,धार्मिक,शिक्षण,राजकीय क्षेत्रातील नावाजलेले संपुर्ण पंचक्रोशीत परिचित असलेले व्यक्तिमत्व…*
*त्यांना एकुण चार मुले पैकी थोरली सौ.गंगुबाई बाळशिराम झिटे,दुसरा भास्करराव,तिसरी स्वर्गीय जिजाबाई बाळासाहेब जगनर आणि चार नंबरचा किशोर* *असे एकुण चार मुले होत.स्वर्गीय जिजाबाई ही पहिल्यापासुन शांत,संयमी,नम्र स्वभावाची मुलगी तिचा जन्म दि.15/06/1979 रोजी अंभोरे येथे श्री.लहानु भिमाजी खेमनर व आई सौ.चंद्रभागा यांचे पोटी झाला.प्राथमिक शिक्षण इयत्ता तिसरी पर्यंत पुर्ण केले आणि आपलेच नात्यातील फार जुना ऋणानुबंध असलेल्या मेहुने श्री.भिका ठका जगनर आणि बहिण यांचा असलेला एकुलता एक मुलगा भाचा श्री.बाळासाहेब भिकाजी जगनर यांचेशी दि.3/01/1997 रोजी विवाह झाला आणि तिस-या पिढीतील एक स्नेहरुपी ऋणानुबंध प्रस्तापित करुन ती नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.प्रथमापासुन* *शांत,संयमी,नम्र,मनमिळावू स्वभावाने स्वर्गीय जिजाबाईने सासरकडील लोक आपलेसे करुन त्यांचे घरात एक महत्वाचे स्थान मिळविले.मुलगा एकुलता एक असल्याने श्री.भिका ठका जगनर आणि सौ.सुंदराबाई भिका जगनर यांनी मुली प्रमाणे तिस वागणूक दिली.स्वर्गीय जिजाबाईने देखील तिच्यावर श्री.लहानु भिमाजी खेमनर आई चंद्रभागा यांनी केलेले आदर्श संस्कार जोपासन्याचे काम केले.आपल्या आई -वडिलांना कधी मान खाली घालवी लागणार नाही याची काळजी घेतली.श्री.बाळासाहेब यांनी देखील एक पत्नी,एक वचनी प्रभू श्रीरामाने सितेस वागविले अगदी त्याच विचाराने जिजाबाईस वागविले.त्यांना अनमोल नावाचा मुलगा झाला.तोही उच्च शिक्षित असुन बी.एस्सी.अँग्री डिग्री पुर्ण केला असुन कृषी उदयोजक म्हणून स्वत: कृषीचे दुकान अंभोरे येथे चालवीत आहे.तो देखील आपल्या आजोबा-आजींनी केलेल्या संस्काराची शिदोरी जोपासन्याचे काम आजतागायत करत आहे.नुकताच 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला आणि नारिचे महत्व विषद केले.स्री शक्तीचा सन्मान या माध्यमातून आपणास बघावयास मिळाला.नारी है,नर की खान! जिसमे पैदा हुए राम,लक्ष्मण,हनुमान…सितेसारखे पावित्र्यवान ‘स्रीचे’ अपहरण झाले आणि रामायण घडले,द्रौपदी सारखे पावित्र्य ‘स्रीचे’ वस्र हरण झाले आणि महाभारत घडले,सती सारखे पावित्र्य ‘स्री’ की,जी आपल्या पतीचे प्राण आणण्या साठी ती स्वत:स्वर्गाचे दिशेने गेले.वटपौर्णिमेला स्री वडाचे झाडाला प्रदक्षिणा घालुन त्याची मनोभावे पुजा करत जन्मो जन्मी हाच पती मिळू दे..अशी निस्वार्थीपणे आपल्या पतिसाठी प्रतिज्ञा करत असते.यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही.अशी एक महान स्री ही जात होय.आणि याच स्री जातीचा सन्मान एकिकडे होत असतांना महिला दिनाचे पूर्व संध्येला काळाने स्री जातीवर घात केला.श्री.बाळासाहेब आणि स्वर्गीय जिजाबाई यांचा अगदी सुखाने चाललेल्या सुखी संसाराला कुणाची वक्रदृष्टी लागली आणि चांगल्या सुंदर अशा संसाराचा प्रवास उलट्या दिशेने सुरु झाला.जिजाबाईस एक आजाराने ग्रासले आणि श्री.बाळासाहेब यांचे संसार रुपी स्वप्न धुळिस मिळाले.जीवनाचे सारीपाटाचे खेळातील चक्र नादुरुस्त झाले आणि श्री.बाळासाहेब यांचा जिवन साथी म्हणून त्यांचे पाठीमागे सदैव सावली सारखी उभी राहणारी स्वर्गीय जिजाबाई हिचा बाळासाहेबाला मिळणारा आधार मावळला.बाळासाहेब,स्वर्गीय जिजाबाईचे विरहाने खुप दु:खी झाले आणि स्वर्गीय जिजाबाईस नामांकित हॉस्पिटल मग ते मुंबई येथिल लिलावती असो की पुणा येथे के.ई .एम.हॉस्पिटलमध्ये तिच्यावर औषोधोपचार करण्यासाठी घेऊन गेले याकामी वडिल श्री.लहानु भिमाजी खेमनर,भाऊ श्री.भास्करराव खेमनर किशोर लहानु खेमनर यांनी खुप परिश्रम घेतले.तिस मिळेल तेथे कोठेही औषोधपचार करण्यासाठी नेण्याचे कमी केले नाही.तिच्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला त्यासाठी किती पैसा लागतो याचा देखील कधीही विचार केला नाही.तिचेसाठी खुप काही शर्थिचे प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्नांना यश आले नाही. जिजाबाईस उपचार झाला नाही. जिजाबाई रुपी रथाचे चाक निखळण्यास सुरुवात झाली.घरातील कर्ती स्री की,जीने संपुर्ण जगनर परिवाराची धुरा स्वत:चे खांद्यावरती घेतली होती ती जिजाबाई होय.ती अतिशय प्रामाणिक,कष्टाळू वृत्ती बाळगून तहानलेल्यांना पाणी,भुकेलेल्यांना अन्न अशा प्रकारचे दान देणारी एक दानशुर स्री म्हणून स्वर्गीय जिजाबाईनी वेगळी ख्याती मिळविली होती.तिने आपल्या जीवनात आपली नाते सबंध जोपसण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत केले.ती खुप धार्मिक होती. नियमीतपणे सकाळी पहाटेच्या वेळी उठुन आपल्या घराची स्वच्छता करुन,स्नान करुन घरातील देपुजा करित असे. आपले स्वत:ची मालकीची दोन एकर शेती राष्ट्रीय संत श्री.श्री.जनार्दन स्वामी दत्त पावन भुमी अंभोरे आश्रमासाठी देण्यासाठी आपले पती श्री.बाळासाहेब आणि सासरे श्री.भिका ठका जगनर यांना देण्यास प्रवृत्त केले त्यांनी देखील कोणत्याही प्रकारचा मनात विचार न आणता क्षणात आपल्या सुनेची अर्थात जिजाबाईची इच्छा पुर्ण केली आणि जमीन मोठ्या मनाने दान केली.संत,महात्म्याचा सहवास स्वर्गीय जिजाबाईस मिळाला.अनेकांची सेवा करण्याचे भाग्य तिस मिळाले.स्वर्गीय जिजाबाईस आजाराने इतके ग्रासले की,जवळ-जवळ 16 वर्षापासून ती आजारी होती.तिस एक चांगला आधार मिळावा म्हणून बंधु भास्करराव खेमनर यांनी त्यांचे जवळचे मावसभाऊ अंभोरे येथिल श्री.जालिंदर रावजी खेमनर यांची मुलगी ‘श्रध्दा’ हिच्याशी भाचा अनमोल बाळासाहेब जगनर याचा विवाह घडवुन आणला आणि बहिण जिजाबाईचे डोळ्यासमोरच अनमोलचा हा विवाह केला.त्यामुळे स्वर्गीय जिजाबाईचे असलेले अनमोलचे विवाहाचे स्वप्न श्री.भास्करराव यांनी पुर्ण केले.अशा प्रकारे श्री.भास्करराव यांनी बहिण स्वर्गीय जिजाबाईची खुप काळजी घेतली.शेवटी सहा महीन्यापासुन स्वर्गीय जिजाबाई अंथुरणावर पडुन राहिली.पती बाळासाहेब,मुलगा अनमोल,सासरे भिकाजी जगनर सासू सौ.सुंदराबाई सुन सौ.श्रद्धा यांनी अखेपर्यंत जिजाबाईची मनोभावे सेवा केली.आणि गुरुवार दि.4/04/2024 चा हा दिवस जिजाबाईचा जीवनाचा अखेरचा दिवस ठरला.आणि जीवनाचा डाव अर्ध्यावर्ती सोडून त्याच दिवशी जिजाबाईने रात्री 9 वा.अखेरचा वयाचे अवघ्या 45 व्या वर्षी श्वास घेतला .फार अल्प आयुष्य स्वर्गीय जिजाबाईस मिळाले.आणि जगनर परिवारातील सर्वांचा निरोप घेतला.अतिशय अल्प आयुष्य जिजाबाईस मिळाले.स्वर्गीय जिजाबाई हिचे निधनाची वार्ता वा-यासारखी अंभोरे गाव आणि पंचक्रोशीत भयानक शांतता पसरली.गावातील छोटे मोठे हॉटेल,किराणा,कापड,भाजीपाला व्यापारी सर्व सामांन्य नागरिक,शेतकरी,शेतमजुर,विविध संघटना,भक्त मंडळ आणि स्थानिक ग्रामपंचायत,दुध संस्था,विविध कार्यकारी सोसायटी,जिल्हा प्राथमिक शाळा,मल्हरराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. व्यापारी यांनी पुर्ण एक दिवस आपली दुकांने बंद ठेवुन स्वर्गीय जिजाबाईच्या प्रति शोक व्यक्त केला.अंभोरे येथिल अमरधाम मध्ये शुक्रवारी सकाळी स्वर्गीय जिजाबाईची अंत्ययात्रा तिचे राहत्या घरापासून गावातील प्रमुख मार्गाने टाळ मृदंगाचे गजरात विविध अभंग गात भजनी मंडळाने अमरधाममध्ये पोहचली. जड दु:खद अंतकरणाने स्वर्गीय जिजाबाईस जगनर परिवार आणि खेमनर परिवारातील नातेवाईक,अप्तेष्ठ,मित्र परिवार,या सर्वांनी अश्रुनयनांनी,स्वर्गीय जिजाबाईचा निरोप घेतला.गावातील ग्रामस्थ,महिला सर्वांनी अखेरचा निरोप दिला.यावेळी सामाजिक,राजकीय,धार्मिक,शिक्षण,सहकार क्षेत्रातील बहुसंख्येने मान्यंवरांनी स्वर्गीय जिजाबाईस भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अमरधाम मध्ये अंत्यविधी समयी स्वर्गीय जिजाबाईस अखेरचा निरोप देण्यासाठी पुरुष,महिला,यांनी गर्दिचा उच्चांक केला होता. एक आदर्श स्रि जातीचा काळाने घात केला आणि एक सुसंस्कृत,शांत,संयमी,विनम्र ,मनमिळावू स्वभावाच्या जिजाबाईचा अतिशय दु:खद असा अंत झाला.श्री.बाळासाहेब यांची पत्नी म्हणून आजन्म साथ देण्याची प्रतिज्ञा केली ती अपूर्णच राहिली.तसेच मुलगा अनमोल याचे जीवनातील मुख्य मार्गदर्शक माता,आई ही कायमची दुर निघुन गेली.त्यामुळे साने गुरुजींनी म्हटल्या प्रमाणे “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”अनमोल आज आपल्या आई विना पोरका झाला.आता यापुढे नेहमी आपली काळजी घेणारी आई माती-आड झाल्याचे अतीव दु:ख त्यास झाले.आईच्या विरहाने तो खुप दु:खी,कष्टी झाला.अनमोलच्या जीवनातील आई नावाचं वादळ कायमचं शमलं.म्हणूनच डोंगराआड गेलेला सुर्य पुन्हा दुस-या दिवशी दिसू शकतो, बाहेर गावी गेलेला व्यक्ती परत माघारी येवू शकते,हरवलेली वस्तू परत शोधून सापडू शकते,चुकलेली व्यक्ती परत येवू शकते याप्रमाणे जिजाबाई रुपी आई अनमोलच्या जिवनातून आजपासून कायमची कोसो दुर निघुन गेली ती आता पुन्हा कधीच माघारी येवू शकणार नाही याची खंत ही जीवनात कायम घर करुन राहिल.आई प्रेमाला,मायेला मी आता पुरे पोरका झाल्याची जाणीव झाली.ही उणीव जीवनात कधीही भरुन निघणार नाही.आई खरच काय असते ? लेकराची माय!वासराची गाय! दूधावरची सांय असते,लंगडयाचा पाय असते,धरणीची ठाय असते,आई असते जन्माची शिदोरी ,सरतही नाही आणि उरतही नाही,जगी माउलीसारखे कोण आहे,जिच्या जन्मांतरीचे ऋण की,ज्यास व्याज नाही,त्या रुनाविणा जीवनास साज नाही .जिच्यासारखे कौतुके बोल नाही,जिच्या यातनांना जगी तोड नाही तिचे नाव जगात “आई “!….आई एवढे कशालाच मोल नाही.प्रेम केले तुम्ही आम्हां सर्वांवर जिवापाड !पण क्षणात झाला नजरे आड ,नाही समजली नियतीची खेळी,निरोप घेतला अमुचा अवेळी,वात्सल्य सिंधू -आई -प्रेम स्वरुप आई ,बोलावू तुजला आज मी कोणत्या पायी!.. स्वर्गीय जिजाबाई बद्दल मी शब्दरुपी श्रद्धांजली अर्पण करत असतांना मी एवढेच म्हणेल की,” वाटले नव्हते कधी आम्हांला असे विघटित घडून येईल!*
*चालता बोलता देव तुम्हांला घेऊन जाईल!…..*
*माणुसकी,मोह,माया,प्रेम याची जेंव्हा चर्चा होईल तेंव्हा सर्वात पहिली आठवण स्वर्गीय जिजाबाईंची येईल!.. स्वर्गीय जिजाबाईचा जीवनपट उलगडत असतांना आता मी माझ्या शब्दांना पुर्णविराम देतो.स्वर्गीय जिजाबाईस परमेश्वराने आपल्या जवळ विलीन करुन तिस जागा द्यावी अशी प्रार्थना करतो.आणि मी माझे हळ्नोर परिवाराचे वतीने स्वर्गीय जिजाबाईस हृदयापासुन शब्द पुष्पांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.*
भावपुर्ण श्रद्धांजली
शब्दांकन:श्री.सुभाषराव हळनोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!