कर्तव्यात कसूर केल्याने पोलिस पाटील निलंबित
राहुरी / लोकवेध live न्यूज 
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल पोलिस पाटील उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी कर्तव्यात कसुर करुन इतर खाजगी ठिकाणी कंपनीत काम करीत असल्याने, तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना काळात जिल्हाबंदीचे आदेश लागु केलेले असतांना सुद्धा आदेशाचे उल्लघंन केले. या कारणावरून पोलीस पाटील उत्तम मुसमाडे यांना श्रीरामपूर विभागाचे प्रांतधिकारी किरण सावंत यांनी निलंबीत करण्याचे आदेश काढले. राज्यात पोलिस पाटलास निलंबित केल्याची घटना प्रथमच राहुरी तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भ्रष्टाचार विरोधी जनजागृती संघाचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार यांनी पोलिस पाटील उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी कर्तव्यात कसुर करुन इतर खाजगी ठिकाणी कंपनीत काम करत असल्याने तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना काळात जिल्हाबंदीचे आदेश लागु केलेले असतांना आदेशाचे उल्लघंन केल्याची तक्रार श्रीरामपूर विभागाचे प्रांतधिकारी यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची पोलिस निरीक्षक व राहुरीचे तहसिलदार यांनी स्वतंत्र अहवाल सादर केला होता. या अहवाला नुसार प्रांतधिकारी यांनी सुनावणी घेवून सादर केलेल्या चौकशी अहवालाचे व समवेत सादर केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता तांभेरे येथील पोलीस पाटील उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी अंभोरा ता. आष्टी येथील एका खाजगी कंपनीत काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तांभेरे येथिल पोलीस पाटील पदावर सेवेत असताना त्या वेळी उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम १९६७, आदेश १९६८ व शासन नियमातील तरतुदीनुसार अटी व शर्ती मान्य असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या आधारे दहा वर्षाच्या मुदतीकरीता महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील पदी नेमणूक करण्यात आली होती. परंतू पोलिस पाटील मुसमाडे यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने, त्याचे पद रद्द करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रांत अधिकारी किरण सावंत यांनी दिले.
राज्यात प्रथमच पोलिस पाटलास निलंबित करण्याचे आदेश प्रांतधिकारी किरण सावंत यांनी काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!