श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सवाचे आयोजन……

संगमनेर / लोकवेध live न्यूज / भाऊसाहेब फड मुख्य विशेष प्रतिनिधी

 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा तीरा वरती ओझर बु हे छोटेसे गाव आहे ओझर हे संपुर्ण बागायती शेती प्रदान व मोठया प्रमाणात दुध व्यवसाय आहे या ठिकाणी अनेक समाजाचे लोक राहत आहेत दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गुडीपाडव्या नंतर सातव्या दिवशी सप्तमीला व अष्टमीला दोन दिवस यात्रा उत्सव असतोय पहिल्या दिवशी दिनांक १४/०४/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता जगदंबा मातेची विधिवत पूजा केली जात आहे व त्यानंतर ९ वाजता आदिशक्ती जगदंबा मातेची भव्यदिव्य मिरवणुक व पालखी संपुर्ण गावातुन काढली जात आहे व त्यानंतर दिवसभर जगदंबा मातेची विधिवत पूजा करून दर्शन घेतले जात आहे व घरोघरी प्रत्येकाच्या घरी विविध प्रकारचे पाहुण्यांसाठी जेवण केले जात आहे

रात्री ठिक ९ वाजता कलाभुषण मास्टर हनुमंत देवकाते नातेपुतेकर यांचा बहुरंगी तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व दुसऱ्या दिवशी दिनांक १५/०४/२०२४ सोमवार सकाळी ९वाजता हजेरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील विविध नामांकित पैलवानसह (कुस्ती) हंगामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
या यात्रेसाठी ओझर बु व संपुर्ण पंचक्रोशीतुन व मुंबई नाशिक पुणे येथील नोकरी निमित्ताने बाहेर असलेलें सर्व भाविक भक्त येत असतात

आदिशक्ती जगदंबा माता हे मंदीर प्रवरेच्या तीरामध्ये मध्यभागी अतिशय सुंदर आहे

आदिशक्ती जगदंबा माता हे जागृत देवस्थान आहे व यांचा तिर्थक्षेत्र की गटांमध्ये समावेश करण्यात आला आहे ही देवी नवसाला पावणारी आहे या ठिकाणी नदी मध्ये सुप्रसिद्ध रांजण खळगे आहेत हे पाहण्यासाठी व आदिशक्ती जगदंबा माता दर्शनासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.
श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथील आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी ओझर बु येथील सरपंच व उपसरपंच पोलिस पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी व विविध सामाजिक संस्था व तरुण मंडळ व आदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!