टिम हिरवांकुरची आमटे दांपत्यांना सदिच्छा भेट.
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
गडचिरोली येथील आनंदवनाचे संस्थापक बाबासाहेब आमटे यांचे चिरंजीव तसेच, आदिवासी सेवक पुरस्कार, गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार मॅगसेस पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित डॉ. श्री. प्रकाश आमटे व डॉ. सौ मंदाकिनी आमटे हे दाम्पत्य आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले होते. पर्यावरण, जैवविविधता, वन्य जीव तसेच गोरगरीब आदिवासी रुग्णांची सेवा याकरता आमटे परिवार जगप्रसिद्ध आहे. अशा या थोर समाजसेवक व पर्यावरण प्रेमींचे मार्गदर्शन आज टिम हिरवांकुरला लाभले. हिरवांकुरचा प्रवास व परिचय श्री.सुरज अकोलकर व श्री.मनोज पाटणी यांनी संस्थेतर्फे करून दिला. “विद्यार्थी दशेतून हिरवांकुर हरितसंस्कार” ही अनोखी संकल्पना समजून घेताना आमटे दांपत्यांनी हिरवांकुर फाउंडेशन नाशिकच्या कार्याची स्तुती केली. तसेच आनंद व्यक्त करत सर्वांचे पर्यावरणाप्रती प्रेम व कार्य पाहता सर्वांना आनंदवनात येण्याचे मनःपूर्वक आमंत्रण दिले. डॉ. सौ मंदाकिनी आमटे, डॉ. प्रकाश आमटे यांच्या मार्गदर्शनाने टिम हिरवांकुर चे सगळेच योद्धे आनंद विभोर झाले होते.
रफिक व्होरा, श्री.रवींद्र पाटील यांनी टीमचा परिचय करून दिला.
याप्रसंगी टिम हिरवांकुर तर्फे संस्थापक अध्यक्ष श्री.निलयबाबु शाह, उपाध्यक्ष श्री.मनोजकुमार पाटणी, रफिक व्होरा, श्री.रवींद्र पाटील, श्री.सुरज अकोलकर, श्री.प्रशांत देवरे श्री.योगेश वारे, सौ. राखी शाह, सौ.दिपाली अकोलकर, कु.सिद्धी कुलकर्णी, कु.वृषाली कुलकर्णी, कु.सोनाली कुलकर्णी, कु.पल्लवी कुलकर्णी, कु.वेलीना शाह, विहान अकोलक, विदिप अकोलकर असे अनेक हिरवांकुर योध्दे उपस्थित होते.
